coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १२७७ रुग्णं नव्याने वाढले; २७ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 08:07 PM2020-10-05T20:07:27+5:302020-10-05T20:08:39+5:30
Thane corona virus news: ठाणे जिल्ह्यातील रुग्ण संंख्या एक लाख ८२ हजार ७७६ झाली आहे. तर मृतांची संख्या चार हजार ६१६ झाली आहे.
ठाणे - जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार २७७ रुग्ण सोमवारी नव्याने सापडले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संंख्या एक लाख ८२ हजार ७७६ झाली आहे. तर, २७ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यातील मृतांची संख्या चार हजार ६१६ झाली आहे.
ठाणे परिसरात आज २८४ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. शहरात ३८ हजार ६३२ रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. तर, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आजपर्यंत एक हजार २९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर कल्याण - डोंबिवली शहरात २८० रुग्णांची आज वाढ झाली असून सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत ४४ हजार ६४ रुग्ण बाधीत झाले आहेत. तर मृतांची संख्या ८५७ आहे.
उल्हासनगरात आज २७ नवे रुग्ण आढळले आहे. तर, एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात रुग्णाची संख्या नऊ हजार ३९९ झाली आहे,. तर, मृतांची संख्या ३०९ झालेली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात आज २२ बाधीत आढळले आहेत. एकाचाही मृत्यू झाला नाही. आता या शहरात बाधितांची संख्या पाच हजार २३० झाली असून मृतांची संख्या ३१३ झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये १७२ रुग्णांची तर, सहा जणांच्या मृत्यूची आज नोंद करण्यात आली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या १९ हजार ४२१ झाली आहे, तर, मृतांची संख्या ५९८ झाली आहे.
अंबरनाथमध्ये ३९ रुग्ण नव्याने वाढले आहे. तर, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात बाधितांची संख्या सहा हजार ५३० झाली आहे. तर, मृतांची संख्या २३६ आहे. बदलापूरमध्ये ५७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या सहा हजार ४५१ झाली आहे. या शहरात आज एकाचाही मृत्यू झाला नाही. त्यामुळे मृत्यूची संख्या ७७ कायम आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात ३० रुग्णांची वाढ झाली आहे. तर, एका जणाचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या १४ हजार ५५४ असून मृतांची संख्या ४१४ झाली आहे.