coronavirus: ठाणे जिल्ह्यात दिवसभरात 1353 रुग्णांची नोंद, तर 35 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 07:53 PM2020-08-19T19:53:53+5:302020-08-19T19:54:20+5:30
ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मंगळवारी देखील घट झाल्याचे दिसून आले. मात्र बुधवारी पुन्हा रुग्णसंख्या वाढली.
ठाणे - ठाणे जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या बराशेवर स्थिरावलेली असतानाच, बुधवारी दिवसभरात 1353 रुग्णांची तर, 35 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या एक लाख 9 हजार 885 तर, मृतांची संख्या आता तीन हजार 142 झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मंगळवारी देखील घट झाल्याचे दिसून आले. मात्र बुधवारी पुन्हा रुग्णसंख्या वाढली. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 325 रुग्णांची तर, 5 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 21 हजार 798 तर, मृतांची संख्या 520 वर पोहोचली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत 361 रुग्णांसह 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या 25 हजार 231 तर, मृतांची संख्या 520 वर गेली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत 21 बाधितांची तर, 6 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 23 हजार 843 तर, मृतांची संख्या 764 वर गेली आहे. मीरा भाईंदरमध्ये 115 रुग्णांची तर, 5 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 11 हजार 104 तर, मृतांची संख्या 374 इतकी झाली आहे. तर, भिवंडी महापालिका क्षेत्रात 82 बधीतांची तर, 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार 18 तर, मृतांची संख्या 278 झाली. तसेच उल्हासनगर 34 रुग्णांची तर, 6 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 7 हजार 433 तर, मृतांची संख्या 196 झाली आहे. अंबरनाथमध्ये 26 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार 546 तर, मृतांची संख्या 175 झाली. बदलापूरमध्ये 63 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 603 इतकी झाली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात 136 रुग्णांची तर, 1 मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 8 हजार 275 तर, मृतांची संख्या 253 वर गेली आहे.