coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १३५९ रुग्ण सापडले;  सहा जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 08:10 PM2021-03-16T20:10:25+5:302021-03-16T20:11:11+5:30

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ, आज तब्बल एक हजार ३५९ बाधीत आढळून आले. गेल्या १५ दिवसात ही सर्वाधिक वाढ असून सहा जणांचा मृत्यू झाला.

coronavirus: 1359 corona patients found in Thane district; Six people died | coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १३५९ रुग्ण सापडले;  सहा जणांचा मृत्यू 

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १३५९ रुग्ण सापडले;  सहा जणांचा मृत्यू 

Next

ठाणे - ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ, आज तब्बल एक हजार ३५९ बाधीत आढळून आले. गेल्या १५ दिवसात ही सर्वाधिक वाढ असून सहा जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात दोन लाख ७८ हजार ९२८ रुग्ण संख्येसह असून सहा हजार २४९ मृत्यूची नोंद मंगळवारी झाली आहे. 


ठाणे शहरात ३७० रुग्ण सापडले आहेत. या शहरात ६६ हजार २१८  रुग्ण नोंद झाले आहे. तर, एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या एक हजार ४१४ झाली. कल्याण - डोंबिवलीत ४८६ रुग्ण आढळून आले असून तिघांचा मृत्यू झाला. या शहरात आता ६७ हजार ५७९ बाधीत असून एक हजार २२० मृत्यू झाले आहेत.
 
उल्हासनगरला ३७ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. आता या शहरात १२ हजार २४२ बाधीत झाले असून मृत्यू संख्या ३७३ झाली आहे. भिवंडीला २३ रुग्ण सापडले असून मृत्यू नाही. येथे सहा हजार ९७७ बाधितांची तर, ३५६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. मीरा भाईंदरला १०७ रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. या शहरात आता २७ हजार ८८ बाधितांसह ८०७ मृतांची नोंद झाली आहे. 
 
अंबरनाथ शहरात ४५ रुग्ण सापडले असून एक मृत्यू नाही. या शहरात आता नऊ हजार २४२ बाधितांसह मृतांची संख्या ३१६ नोंदवण्यात आली. बदलापूर परिसरामध्ये ६८ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण नऊ हजार ६४० झाले असून एकही मृत्यू नसल्याने मृत्यूची संख्या १२३ आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये ९८ रुग्णांचा शोध घेण्यात असून मृत्यू नाही. या गांवपाड्यांत २० हजार ४९ बाधीत झाले असून ५९९ जणांचा मृत्यू झालेला आहे.

Web Title: coronavirus: 1359 corona patients found in Thane district; Six people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.