coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १४३० रुग्ण नव्याने सापडले, ३० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 07:29 PM2020-10-04T19:29:42+5:302020-10-04T19:32:04+5:30

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८१ हजार ४९९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात चार हजार ५८९ मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. 

coronavirus: 1430 new corona patients found in Thane district, 30 die | coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १४३० रुग्ण नव्याने सापडले, ३० जणांचा मृत्यू

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १४३० रुग्ण नव्याने सापडले, ३० जणांचा मृत्यू

Next

ठाणे  - जिल्ह्यात एक हजार ४३० रुग्णांची रविवारी नव्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८१ हजार ४९९ रुग्णांची नोंद झाली आहे. आज ३० जणांच मृत्यू झाल्यामुळे आता जिल्ह्यात चार हजार ५८९ मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. 

ठाणे शहरात ३७३ रुग्ण आज नव्याने सापडले आहेत. या शहरात ३८ हजार ३४८ रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली. तर, सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता मृतांची संख्या एक हजार २४ झाली आहे. तर कल्याण - डोंबिवली शहरात ३९२ रुग्णांची आज वाढ झाली असून सहा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत ४३ हजार ७८४ रुग्ण बाधीत झाले. तर, ८५० मृत्यूची नोंद आज करण्यात आली आहे.

उल्हासनगरला ५० नवे रुग्ण आढळले असून, दोन जणांचा आज मृत्यू झाला आहे. या शहरात आतापर्यंत बाधीत रुग्ण नऊ हजार ३९९ झाले आहेत. तर,  मृतांची संख्या ३०८ नोंदवण्यात आली आहे. भिवंडीला आज ५२ बाधीत आढळून आले आहेत. तर, आज एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत पाच हजार २०८ असून मृतांची संख्या ३१३ झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये १७९ रुग्णांची तर, पाच मृत्यूची नोंद केली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या १९ हजा २४९ झाली आहे, तर, मृतांची संख्या ५९२ झाली आहे.

अंबरनाथमध्ये ४० रुग्णांची नव्याने वाढ झाली असून तीन मृत्यूची नोंद झाली आहे. आत बाधितांची संख्या सहा हजार ४९१ झाली असून मृतांची संख्या २३४ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ५८ रुग्णांची नोंद झाल्यामुळे आता बाधीत सहा हजार ३९४ झाले आहेत. या शहरात आजही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत ७७ मृत्यूची नोंद कायम आहे. 

जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये एक रुग्ण नव्याने वाढला असून आज एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत १४ हजार ५२४ आणि मृत्यू ४१३ झाले आहेत.

Web Title: coronavirus: 1430 new corona patients found in Thane district, 30 die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.