coronavirus: भाईंदरमध्ये झोपडपट्टीत कोरोनाचे १६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 03:26 AM2020-05-16T03:26:11+5:302020-05-16T03:26:28+5:30
झोपडपट्टीत कोरोनाचा वाढता संसर्ग चिंतेचा विषय ठरला असून पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त संभाजी वाघमारे, वैद्यकीय अधिकारी आदींनी शुक्रवारी झोपडपट्टीची पाहणी केली.
मीरा रोड : भाईंदरच्या गणेशदेवल नगर या दाट वस्ती असलेल्या झोपडपट्टीत कोरोनाचे १६ रुग्ण सापडले असून येथील एकाचा मृत्यू झाला आहे. येथे कोरोना झपाट्याने पसरण्याची भीती पाहता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने येथील १०० ते १२५ कुटुंबांना मीरा रोडच्या डेल्टा गार्डनजवळ हलवण्याचा निर्णय घेतला आहे.गुरुवारी याच परिसरातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या आधी येथून ५ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. १ मे रोजी येथील एकाला शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूची नोंद पालिकेने त्यांच्या दैनंदिन अहवालात घेतली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
झोपडपट्टीत कोरोनाचा वाढता संसर्ग चिंतेचा विषय ठरला असून पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त संभाजी वाघमारे, वैद्यकीय अधिकारी आदींनी शुक्रवारी झोपडपट्टीची पाहणी केली.वाघमारे म्हणाले की येथील दाटवस्ती व नागरिकांचा राबता पाहून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या परिसरातील कुटुंबांना स्वतंत्र इमारतीत १४ दिवसांसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
भिवंडीत आठ नवे रु ग्ण
भिवंडी शहरात पाच तर ग्रामीण भागात तीन असे शुक्र वारी आठ नवे रु ग्ण आढळले. पालिका क्षेत्रात ३५ वर्षीय महिला व २९ वर्षीय पुरु ष हे दोघे गोवंडीहून भिवंडीत आले होते. त्याच वेळी त्यांना क्वारंटाइन केले होते.
तिसरा रु ग्ण ५५ वर्षीय पुरु ष कामतघर येथील असून तो कोरोना रु ग्णाच्या सहवासात आल्याने त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
चौथा रु ग्ण हा शहरातील नवी वस्ती येथील ३७ वर्षीय पुरु ष असून टीबी ट्रीटमेंट घेत होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
पाचवा रु ग्ण ७० वर्षीय महिला असून मुंब्रा येथील रुग्णालयात दाखल असताना पॉझिटिव्ह आढळली आहे. त्या बंदर मोहल्ला येथील रहिवासी
आहेत.