coronavirus: कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे १६ नवे रुग्ण,  एकूण रुग्णसंख्या ३२१    

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 02:34 AM2020-05-11T02:34:29+5:302020-05-11T02:34:48+5:30

नव्या रुग्णांमध्ये तीन पोलिसांना कोरोना झाला आहे. त्यात एका महिला पोलिसांचा समावेश असून ती कल्याण पूर्वेत राहते. उर्वरित दोन पोलिसांपैकी एक जण डोंबिवली पूर्व तर दुसरा कल्याण पश्चिमेला वास्तव्याला आहे.

coronavirus: 16 new corona patients in Kalyan-Dombivali, total number of patients 321 | coronavirus: कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे १६ नवे रुग्ण,  एकूण रुग्णसंख्या ३२१    

coronavirus: कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे १६ नवे रुग्ण,  एकूण रुग्णसंख्या ३२१    

googlenewsNext

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत रविवारी कोरोनाचे १६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी डोंबिवली पूर्वेतील ५६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांचा आकडा पाच झाला आहे. एकूण रुग्णांची संख्या ३२१ झाली आहे.

नव्या रुग्णांमध्ये तीन पोलिसांना कोरोना झाला आहे. त्यात एका महिला पोलिसांचा समावेश असून ती कल्याण पूर्वेत राहते. उर्वरित दोन पोलिसांपैकी एक जण डोंबिवली पूर्व तर दुसरा कल्याण पश्चिमेला वास्तव्याला आहे. डोंबिवली पश्चिमेतील एका सरकारी रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. खाजगी कंपनीत काम करणाºया दोन जणांना कोरोना झाला असून ते डोंबिवली पश्चिमेला राहणारे आहेत. कल्याण पूर्वेत राहणा-या आणि मुंबईतील खाजगी रुग्णालयात काम करणाºया एका कर्मचाºयालाही लागण झाली आहे. तसेच ठाण्यातील सरकारी नोकरी करणा-या कल्याण पूर्वेतील एकाला कोरोना झाला आहे. कल्याण पूर्वेतीलच १४ वर्षांच्या मुलीसह एक महिला व पुरुषांचा समावेश आहे. त्याचबरोबर कल्याण पश्चिमेतील चार वर्षांच्या मुलीसह कल्याण पूर्वेतील एका महिलेलाही कोरोना झाला आहे. हे सहा जण मुंबईला जाणाºया कोरोनाबाधित रुग्णांच्या सान्निध्यात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
आतापर्यंत सापडलेल्या ३२१ रुग्णांपैकी कल्याण-डोंबिवलीतून मुंबईत येजा करणाºया कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या १३० आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या ४७ जणांना कोरोना झाला आहे. उपचार घेत असलेल्या सहा जणांना घरी सोडण्यात आले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९१ झाली आहे. सध्या २२५ रुग्ण उपचार घेत आहेत.

भिवंडी शहर व ग्रामीणमध्ये एकाच दिवसात १२ रुग्णांची वाढ

भिवंडी शहर व ग्रामीण भागात रविवारी १२ रुग्णांची वाढ झाली. शहरात ४ तर ग्रामीण भागात ८ नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांमुळे शहरातील एकूण संख्या २५ वर पोहोचली आहे, तर ग्रामीण भागातील रुग्णसंख्या २३ वर गेली आहे.

कमला हॉटेल येथील रहिवासी असलेला २८ वर्षीय तरुण व २४ वर्षीय महिला असे दोघे मुंबईहून आल्यानंतर त्यांना क्वारंटाइन कक्षात दाखल केले होते. कुर्ला येथून गायत्रीनगर येथे घरी परतलेली ६२ वर्षीय महिला व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एका १९ वर्षीय युवकास लागण झाली आहे.

२२ रुग्णांवर उपचार सुरू असून ३५६ हून अधिक व्यक्तींना क्वारंटाइन केले आहे. ग्रामीण भागातील डुंगे ग्रामपंचायत क्षेत्रात तब्बल सात नवे रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. तर, कोनगावातही एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला.

उल्हासनगरमध्ये नवे चार रुग्ण
उल्हासनगर : शहरात नवे चार कोरोना रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. बेस्टमध्ये काम करणाºया कर्मचाºयासह त्याच्या संपर्कात आलेला एक रुग्ण, किराणा दुकानदार व कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील एक असे चार रुग्ण आढळले. शनिवारी १७ रुग्ण आढळल्यामुळे पालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. रविवारी कॅम्प नं-४, श्रीराम चौकात राहणारा व बेस्टमध्ये काम करणाºया कर्मचाºयास तसेच त्याच्या संपर्कातील एकाला कोरोना झाला. कॅम्प नं-४ स्टेशन रस्त्यावरील किराणा दुकानदार व संभाजी चौक परिसरातील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील एकाला कोरोना झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

उल्हासनगरमध्ये नवे चार रुग्ण
उल्हासनगर : शहरात नवे चार कोरोना रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. बेस्टमध्ये काम करणाºया कर्मचाºयासह त्याच्या संपर्कात आलेला एक रुग्ण, किराणा दुकानदार व कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील एक असे चार रुग्ण आढळले. शनिवारी १७ रुग्ण आढळल्यामुळे पालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. रविवारी कॅम्प नं-४, श्रीराम चौकात राहणारा व बेस्टमध्ये काम करणाºया कर्मचाºयास तसेच त्याच्या संपर्कातील एकाला कोरोना झाला. कॅम्प नं-४ स्टेशन रस्त्यावरील किराणा दुकानदार व संभाजी चौक परिसरातील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील एकाला कोरोना झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

 

Web Title: coronavirus: 16 new corona patients in Kalyan-Dombivali, total number of patients 321

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.