Coronavirus: उल्हासनगरात आज कोरोनाचे नवे १६ रुग्ण आढळले, एकूण रुग्णसंख्या ११९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 03:05 PM2020-05-17T15:05:43+5:302020-05-17T15:05:52+5:30
शहरात रविवारी आलेल्या अहवालात ब्राम्हण पाड्यातील ८, गोलमैदान येथील ४ असे एकूण १९ कोरोना रुग्ण आढळून आले
उल्हासनगर: उल्हासनगर महापालिका हद्दीत आज कोरोनाची लागण झालेले १६ नवे रुग्ण आढळून आल्याने महापालिकेच्या चिंतेत वाढ झाली. कॅम्प नं -३ चोपडा कोर्ट, खन्ना कॅम्पावुंड, ब्राम्हण पाडा व सम्राट अशोकनगर, गोल मैदान आदी परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असून एकूण संख्या ११९ झाली.
शहरात रविवारी आलेल्या अहवालात ब्राम्हण पाड्यातील ८, गोलमैदान येथील ४ असे एकूण १९ कोरोना रुग्ण आढळून आले. कोरोना रुग्णाची एकूण संख्या ११९ झाली असून त्यापैकी ५ जनाचा मुत्यु झाला. तर ३१ जण कोरोना मुक्त झाले. ब्राह्मण पाडा, सम्राट अशोकनगर, खन्ना कॉम्पाउंड व गोळमैदान परिसर हॉटस्पॉट ठरले. ब्राम्हण पाड्यात कोरोना रुग्णाची संख्या ३० पेक्षा जास्त झाली असून खन्ना कॉम्पउंड मध्ये १२, सम्राट अशोकनगर १९, गोल मैदान १० असे कोरोना रुग्ण आहेत. शहरात एका आठवड्यात तब्बल ८० पेक्षा जास्त कोरोना रुग्णाची भर पडली असून महापालिका प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. ब्राह्मण पाड्यात राहणाऱ्या एका कोरोनाग्रस्त मुंबई पोलिसाच्या संसर्गामुळे कोरोनाच्या रुग्णात वाढ झाली. तसाच प्रकार सम्राट अशोकनगर व खन्नाकॉम्पउड येथे झाला असून महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यानी हि माहिती दिली.