CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख चढा; शुक्रवारी १७४७ रुग्ण आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 02:49 AM2020-10-10T02:49:28+5:302020-10-10T02:49:40+5:30
CoronaVirus Thane News: दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू
ठाणे : कोरोनाच्या रुग्णसंख्येत शुक्रवारी तब्बल एक हजार ७४७ ने वाढ झाली असून आतापर्यंत एक लाख ८९ हजार ६१ व्यक्तींना लागण झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या चार हजार ७७७ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.
ठाणे शहरात ४०० नवे रुग्ण आढळले. परिणामी, शहरात आतापर्यंत ४० हजार ९४ रुग्णांची नोंद करण्यात आली. दिवसभरात ठाण्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवली शहरांत शुक्रवारी ३६७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून नऊ जणांचे मृत्यू झाले आहेत. उल्हासनगरात ४१ नवे रुग्ण आढळले असून, एकाचा आज मृत्यू झाला. भिवंडीला ४३ नवे रुग्ण आढळून आले. भिवंडीतील एकूण रुग्णसंख्या पाच हजार ३६० असून मृतांची संख्या ३२२ आहे. मीरा-भार्इंदरमध्ये नव्या १९५ रुग्णांची तर, सात मृत्यंूची नोंद झाली. अंबरनाथमध्ये ४४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. बदलापूरमध्ये ५२ नवे रुग्ण सापडल्यामुळे आता बाधित सहा हजार ६२६ आहेत.
वसई-विरारमध्ये आठ रुग्णांचा मृत्यू
वसई : वसई-विरार महापालिका हद्दीत शुक्रवारी दिवसभरात १६४ नवे रुग्ण आढळून आले असून चिंताजनक म्हणजे दिवसभरात आठ रुग्णांचा मृत्यू झाला. यात एकट्या वसईत सहा आणि नालासोपारात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रायगडमध्ये ३२९ नवे रु ग्ण
अलिबाग : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी ९ आॅक्टोबर रोजी दिवसभरात ३२९ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ४९ हजार ९६६ वर पोहोचली आहे. दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत ८९ टक्के रुग्ण कोरोनामुक्त
नवी मुंबई : शहरात दिवसभरात ४३३ रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ३५,४१३ झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्क्यांवर पोहोचले आहे. शुक्रवारी ३५६ नवीन रुग्ण वाढले आहेत.