coronavirus: ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या १८००६९ रुग्णांची नोंद; शनिवारी ३२ जणांचे मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 08:53 PM2020-10-03T20:53:13+5:302020-10-03T20:54:46+5:30

corona virus Thane News:जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८० हजार ६९ रुग्ण संख्या झाली आहे. तर, आज ३२ जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या चार हजार ५५९ झाली आहे

coronavirus: 180069 corona patients registered in Thane district so far; At least 32 people were killed on Saturday | coronavirus: ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या १८००६९ रुग्णांची नोंद; शनिवारी ३२ जणांचे मृत्यू  

coronavirus: ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या १८००६९ रुग्णांची नोंद; शनिवारी ३२ जणांचे मृत्यू  

Next

ठाणे  - जिल्ह्यात शनिवारी एक हजार ५५१ नवे रुग्णं आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८० हजार ६९ रुग्ण संख्या झाली आहे. तर, आज ३२ जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या चार हजार ५५९ झाली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाने दिली आहे. तर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रासह अंबरनाथ, बदलापूर परिसरामध्ये आज एकही मृत्यू झालेला नसल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

ठाणे शहर परिसरात आज ४०२ रुग्ण नव्याने सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ३७ हजार ९७५ रुग्णांची नोंद केली आहे. तर, आज आठ मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या एक हजार १८ नोंदवण्यात आली आहे. कल्याण - डोंबिवली परिसरात २७७ नवीन रुग्ण आढळून आले असून सहा जणांचे मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत ४३ हजार ३९२ रुग्ण बाधीत झालेले असून मृतांची संख्या ८४४ झाली आहे.

उल्हासनगर क्षेत्रात आज ६२ रुग्ण सापडले आहेत. तर, तीन मृत्यू झाले आहेत. येथे आतापर्यंत नऊ हजार ३४९ रुग्ण संख्या झाली असून मृतांची संख्या ३०६ झाली आहे. नवी मुंबईला ३९९ रुग्णांची तर, सात मृतांची आज नोंद झाली आहे. या शहरात आतापर्यंत बाधीत ३७ हजार ८१७ झाले असून मृतांची संख्या ७७० नोंदवण्यात आली आहे.

भिवंडी मनपा क्षेत्रात २८ बाधीत आढळून आले असून एका जणाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पाच हजार १५६ बाधीत असून मृतांची संख्या ३१३ झालेली आहे. मीरा भाईंदरमध्ये २०० रुग्णांची तर आज सात मृत्यूची नोंद झाली आहे. या शहरात १९ हजार ७० बाधितांसह आता मृतांची संख्या ५८७ झाली आहे.

अंबरनाथमध्ये ६८ रुग्णं सापडले असून आज एकाही मृताची नोंद नाही. आता बाधितांची संख्या सहा हजार ४५१ असून मृत्यू २३१ कायम आहेत. बदलापूरमध्ये ६६ रुग्णांचा शोध नव्याने लागल्यामुळे आता बाधीत सहा हजार ३३६ झाले आहेत. या शहरात आज एकही मृत्यू झाला नसल्यामुळे मृत्यूची संख्या ७७ कायम आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये ४९ रुग्ण आज सापडले असून एकही मृत्यू झाला नाही. या ग्रामीण क्षेत्रात बाधितांची संख्या १४ हजार ५२३ झाली असून मृतांची संख्या ४१३ आहे.

Web Title: coronavirus: 180069 corona patients registered in Thane district so far; At least 32 people were killed on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.