coronavirus: ठाणे जिल्ह्यात एक हजार ८५५ कोरोनाबाधित रुग्णांची तर, ४३ जणांच्या मृत्यूची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 09:01 PM2020-10-07T21:01:09+5:302020-10-07T21:03:41+5:30

Thane coronavirus News : ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत ४१४ बाधितांची तर, ७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ३९ हजार ३५८ तर, मृतांची संख्या एक हजार ४२ वर गेली आहे.

Coronavirus: 1,855 coronavirus patients and 43 deaths in Thane district | coronavirus: ठाणे जिल्ह्यात एक हजार ८५५ कोरोनाबाधित रुग्णांची तर, ४३ जणांच्या मृत्यूची नोंद

coronavirus: ठाणे जिल्ह्यात एक हजार ८५५ कोरोनाबाधित रुग्णांची तर, ४३ जणांच्या मृत्यूची नोंद

Next

ठाणे -  ठाणे जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या घटणाऱ्या संख्येत बुधवारी पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. ठाणे जिल्ह्यात बुधवारी एका हजार ८५५ कोरोना रुग्णांसह ४३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या १ लाख ८५ हजार ७९७ तर, मृतांची संख्या आता ४ हजार ६८७ झाली आहे. 

ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत ४१४ बाधितांची तर, ७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ३९ हजार ३५८ तर, मृतांची संख्या एक हजार ४२ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३५६ रुग्णांची तर, ५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आहे. कल्याण डोंबिवलीत ३८९ रुग्णांसह ९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. मीरा भाईंदरमध्ये २२१ रुग्णांची तर, ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर, भिवंडी महापालिका क्षेत्रात ४१ बधीतांची तर, २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात झाली. तसेच उल्हासनगर ३६ रुग्णांची तर, २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अंबरनाथमध्ये ५८ रुग्णांसह २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर, बदलापूरमध्ये ४५ रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात २९५ रुग्णांची तर, ९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या १४ हजार ८६२ तर, मृतांची संख्या ४२६ वर गेली आहे.

Web Title: Coronavirus: 1,855 coronavirus patients and 43 deaths in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.