Coronavirus : ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे २ हजार१९० रुग्ण, ५२ जणांचा मृत्यू    

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 09:19 PM2021-05-04T21:19:46+5:302021-05-04T21:20:12+5:30

Coronavirus in Thane : ठाणे जिल्ह्यातील महापालिकांसह ग्रामीण गांवपाड्यात गेल्या २४ तासात मंगळवारी दोन हजार १९० कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

Coronavirus: 2,190 coronavirus patients found in Thane district today, 52 die | Coronavirus : ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे २ हजार१९० रुग्ण, ५२ जणांचा मृत्यू    

Coronavirus : ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे २ हजार१९० रुग्ण, ५२ जणांचा मृत्यू    

Next

ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांसह ग्रामीण गांवपाड्यात गेल्या २४ तासात मंगळवारी दोन हजार १९० कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज ५२ जणांचा मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या सात हजार ७८० झाली . तर आतापर्यंत रुग्ण संख्या चार लाख ७७ क्हजार १७७ लाली आहे.

ठाणे शहर परिसरात आज ५५२ रुग्णांची वाढ होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात एकूण एक लाख २१ हजार ४७७ रुग्णांसह एक हजा ७०७ मृतांची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीत ५६८ रुग्णांची वाढ तर ११ मृत्यू झाले आहेत. या शहरातील रुग्ण संख्या एक लाख २३ हजार ३४१ झाली असून मृतांची संख्या आता एक हजार ४७३ नोंदली आहे. 

उल्हासनगरला ७० रुग्ण आढळले असून दोन मृत्यू झाले. येथील मृतांची संख्या आता ४३९ झाली असून रुग्ण संख्या१९ हजार १४५ नोंद झाली. भिवंड शहरात २४ रुग्ण आढळले असता दोन तीन मृत्यू झाले.  या शहरा न ऊ हजार ९४२ रुग्णांसह ३९७ मृतांची नोंद करण्यात आली. मीरा भाईंदरलाही २१६ रुग्णांच्या वाढीसह आज आठ मृत्यू झाले. येथील रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ६९३ झाली असून म मृतांची संख्या एक हजार ६४ नोंद झाली.

अंबरनाथ शहरात ७५ रुग्ण वाढल्याने येथील रूग्ण संख्या आता १८ हजार ८९झाली. तर ३८९  मृतांची नोंद करण्यात आली. बदलापूरला ११९ रुग्णांची वाढ होऊन दोन मृत्यू झाले. याप्रमाणेच ग्रामीण भागात २४० रुग्ण आढळले असून पाच मृत्यू झाले . आता जिल्ह्यातील या गांवपाड्यात २७ हजार ५९४ रुग्णांसह ७०३ मृतांची नोंद करण्यात आली.

Web Title: Coronavirus: 2,190 coronavirus patients found in Thane district today, 52 die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.