Coronavirus : ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे २१९३ रुग्ण, ४३ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 09:42 PM2021-05-03T21:42:17+5:302021-05-03T21:43:07+5:30
Coronavirus in Maharashtra : ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या गेल्या २४ तासात सोमवारी दोन हजार १९३ रुग्णांनी वाढली आहे. यासह जिल्ह्यातील रुग्ण संख्या चार लाख ७४ हजार ९८७ झाली आहे.
ठाणे - जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या गेल्या २४ तासात सोमवारी दोन हजार १९३ रुग्णांनी वाढली आहे. यासह जिल्ह्यातील रुग्ण संख्या चार लाख ७४ हजार ९८७ झाली आहे. ४३ जाणांच्या मृत्यूने आता एकूण मृतांची संख्या सात हजार ७२८ नोंद झाली. (2193 coronavirus patients found in Thane district today, 43 died)
ठाणे महापालिका क्षेत्रात आज ५१६ रुग्ण सापडल्याने आता येथील रुग्ण संख्या एक लाख २० हजार ९२५ झाली आहे. तर न ऊ रुग्ण दगावल्याने येथील एकूण मृतांची संख्या एक हजार ६९८ झाली. कल्याण डोंबिवलीत आज ४९८ रुग्णांच्या वाढीसह न ऊ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे आता एक लाख २२ हजार ७७३ रुग्णांसह मृतांची संख्या एक हजार ४६२ नोंद झाली आहे.
उल्हासनगरमध्ये आज ५२ रुग्ण सापडले असून एक मृत्यू झाला आहे. येथील १९ हजार ७५ रुग्णांसह ४३४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. भिवंडीला आज २२ रुग्ण आढळले असून दोन मृत्य झाले. येथील रुग्ण संख्या आता १९ हजार ९१८ झाली असून मृतांणी संख्या ३९४ नोंद झाली. मीरा भाईंदर परिसरात आज २८८ रुग्ण वाढीने ४४ हजार ४७७ बाधीत नोंद झाले. येथे साज जणांच्या मृतामुळे एक हजार ५६ मृत्यू नोंद झाले.
अंबरनाथ परिसरा ६६ बाधितांसह एकाचा मृत्यू झाला. येथे आता १८ हजार १४ बाधितांसह ३८९ मृत्यू नोंदवले. कुळगांव बदलापूरला १२५ बाधीत आढळले असून पाच मृत्यू झाले. आता १८ हजार ९३० बाधीत झाले असून १९९ मृत्यू नोंद झाले आहेत. गांवपाड्यात३४९ बाधीत आढळल्यामुळे रुग्ण संख्या आता २७ हजार ३५४ नोंद झाली. दोन जणांच्या मृत्यूने मृतांची संख्या ६९८ झाली आहे.