Coronavirus : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे २२७४ रुग्णांच्या वाढीसह ५२ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 09:37 PM2021-05-07T21:37:21+5:302021-05-07T21:39:45+5:30
Coronavirus in Thane : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन हजार २७४ ने वाढली असून ५२ जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत घर लाख ८४ हजर ७६९ रुग्णांची व सात हजार ९३५ मृतांची नोंद करण्यात आली आहे.
ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन हजार २७४ ने वाढली असून ५२ जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत चार लाख ८४ हजर ७६९ रुग्णांची व सात हजार ९३५ मृतांची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील या रुग्ण संख्येत ठाणे शहरभर आज आढळलेल्या ४४५ रुग्णांसह दहा मृतांचा समावेश आहे. यासह जिल्ह्यातील बाधितांची संख्या एक लाख २३ हजार २३८ झाली असून मृतांची संख्या एक हजार ७३५ नोंदली गेली. याप्रमाणेच कल्याण डोंबिवलीत आज ७१४ बाधीत व १४ मृत्यू झाल्याचे आढळले आहेत. यासह या शहरात एक लाख २५ हजार ४२७ बाधितांसह एक हजार ५१२ मृतांची नोंद करण्यात आली आहे.
उल्हासनगरमध्ये आज ५२ बाधीत व दोन मृत्यू झाले आहेत. यासह शहरात १९ हजार ३०१ बाधितांना ४४३ मृतांची नोंद केल्या गेली आहे. भिवंडीत २१ बाधीत व एक मृत्यू झाल्याचे आढळले. यासह या शहरातील दहा हजार २३ बाधितांसह ४०२ मृत्यू नोंद झाले आहे. मीरा भाईंदरला आज २३७ बाधीत व दहा मृत्यू झाले आहेत. या शहरातील ४५ हजार ५३७ बांधिता व एक हजार ९६ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अंबरनाथमध्ये ६२ बाधीत व दोन मृत्यू झाल्याचे आढळले आहेत. यामुळे आता येथील बाधितांची संख्या १८ हजार ३४७ व मृतांची संख्या ३९२ नोंदली गेली आहे. कुळगांव बदलापूर शहरात आज १०१ बाधीत सापडले. यासह येथील बाधीत १९ हजार ३९५ तर मृत्यू २०२ झाले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३७४ बाधीत आणि चार जणांचा आज मृत्यू झाला. यामुळे या ग्रमीण क्षेत्रात आजपर्यंत २८ हजार ८३३ बाधितांची व ७२२ मृतांची नोंद केली आहे.