coronavirus : धोक्याची घंटा, ठाणे महापालिका हद्दीत आठवडाभरात ३०१ रुग्ण, झोपडपट्टीत प्रमाण जास्त  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 03:50 AM2020-05-10T03:50:57+5:302020-05-10T03:51:39+5:30

मार्च आणि एप्रिल महिन्यांत शहरात ३०० च्या आसपास रुग्ण होते. मात्र, मे महिना उजाडला आणि रुग्णांच्या संख्येत गुणाकाराने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठ दिवसांत रुग्णांची संख्या तब्बल ३०१ ने वाढली आहे.

coronavirus: 301 patients in a week in Thane municipal area, the number in slums is high | coronavirus : धोक्याची घंटा, ठाणे महापालिका हद्दीत आठवडाभरात ३०१ रुग्ण, झोपडपट्टीत प्रमाण जास्त  

coronavirus : धोक्याची घंटा, ठाणे महापालिका हद्दीत आठवडाभरात ३०१ रुग्ण, झोपडपट्टीत प्रमाण जास्त  

Next

ठाणे - ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या गुणाकाराने वाढताना दिसत आहे. आतापर्यंत महापालिका हद्दीत ६५० च्या आसपास रुग्ण आढळले आहेत. यामध्ये गेल्या आठवडाभरात तब्बल ३०१ रुग्ण वाढल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. मागील काही दिवसांत ३० ते ६५ रुग्ण एका दिवसात वाढले असून झोपडपट्टीतील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.

 मार्च आणि एप्रिल महिन्यांत शहरात ३०० च्या आसपास रुग्ण होते. मात्र, मे महिना उजाडला आणि रुग्णांच्या संख्येत गुणाकाराने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठ दिवसांत रुग्णांची संख्या तब्बल ३०१ ने वाढली आहे. सुरुवातीला सोसायटीमध्ये काही प्रमाणात रुग्ण आढळत होते. परंतु, एप्रिलअखेरपासून कोरोनाने झोपडपट्टीत शिरकाव केल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. यात लोकमान्यनगर-सावरकरनगर आणि वागळे या दोन प्रभाग समित्यांत या दिवसांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून या दोन प्रभाग समित्यांमध्येच कोरोनाचे २५० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. वागळे प्रभाग समितीत आजघडीला ११० हून अधिक तर लोकमान्यनगरमध्ये १६० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर, नौपाडा आणि कोपरीतही ही संख्या ६० च्या वर गेली आहे. मुंब्य्रात हे प्रमाण ८० पर्यंत आले आहे. परंतु, इतर प्रभाग समित्यांच्या तुलनेत लोकमान्यनगर आणि वागळे या पट्ट्यात झोपडपट्टी भागातच कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसत आहे. 

दरम्यान, उल्हासनगरमध्ये १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णांची संख्या ३५ झाली आहे. सम्राट अशोकनगरमधील कोरोना संसर्ग झालेल्या महिलेच्या संपर्कातील तब्बल ११ जणांना कोरोना झाला आहे. तसेच शांतीनगर येथील पोलिसाच्या संपर्कातील दोघे, चोपडा कोर्ट येथील दोघे, गोलमैदान येथील एकाला असा १७ जणांना संसर्ग झाला आहे. 

शहापूरमध्ये कोरोनाचे नवे पाच रुग्ण 

शहापूर : शहापूर तालुक्यात शनिवारी नवे पाच रुग्ण आढळले. शहापूरमध्ये २, किन्हवलीत १ आणि वासिंदमध्ये २ रुग्ण आढळल्याने रुग्णांची एकूण संख्या १७ झाली आहे. 



भिवंडीत नवा रुग्ण 
भिवंडी : येथील ग्रामीण भागात असलेल्या काल्हेर येथे एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. काल्हेर येथील गोदामपट्ट्यात हा रुग्ण चहाविक्री करतो, असे सांगण्यात आले. 

बदलापूरमध्ये तीन रुग्ण
बदलापूर : शहरात शनिवारी तीन  रुग्ण आढळले. त्यातील दोघे  मुंबईच्या रुग्णालयात काम करतात. तर, एक ६४ वर्षीय महिला आहे.  कात्रप येथील एका ५५ वर्षीय सफाई कामगारालाही लागण झाली आहे. 

 

Web Title: coronavirus: 301 patients in a week in Thane municipal area, the number in slums is high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.