coronavirus: अंबरनाथमधील कोविड रुग्णालयात 34 बेड शिल्लक, वाढीव रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्थेची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 02:57 AM2021-03-31T02:57:38+5:302021-03-31T02:59:18+5:30

coronavirus in Ambernath : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाची एकूण रुग्णसंख्या ही ५०० बेडची असून, त्या ठिकाणी ४६६ जण उपचार घेत आहेत. त्यामुळे अवघे ३४ बेड शिल्लक राहिले असून, येत्या दोन दिवसांत तेही भरले जाणार आहेत.

coronavirus: 34 beds remaining at Kovid Hospital in Ambernath, need for separate arrangements for incremental patients | coronavirus: अंबरनाथमधील कोविड रुग्णालयात 34 बेड शिल्लक, वाढीव रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्थेची गरज

coronavirus: अंबरनाथमधील कोविड रुग्णालयात 34 बेड शिल्लक, वाढीव रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्थेची गरज

Next

अंबरनाथ  - अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाची एकूण रुग्णसंख्या ही ५०० बेडची असून, त्या ठिकाणी ४६६ जण उपचार घेत आहेत. त्यामुळे अवघे ३४ बेड शिल्लक राहिले असून, येत्या दोन दिवसांत तेही भरले जाणार आहेत. त्यामुळे वाढीव रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत आहे. 
 
अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने जांभूळ गाव येथील डेंटल महाविद्यालयात ५०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले आहे. या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले आहेत. एका दिवसात तेही भरणार असल्याने शहरातील वाढत्या रुग्णाला संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पर्यायी रुग्णालयाची गरज भासत आहे. कोविड रुग्णालयातील बेडची संख्या अपुरी पडत असल्याने आता कोविडमुळे गंभीर झालेल्या रुग्णांना प्रथम प्राधान्य देऊन त्या ठिकाणी उपचार केले जात आहेत, तर कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना अवघ्या तीन ते चार दिवसांतच घरी सोडण्यात येत आहे.
 
अंबरनाथमध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयातील बेडची संख्या अपुरी पडत असल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक आढावा बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतही अंबरनाथ शहर आणखी २०० ते २५० शे बेड रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

डेंटल महाविद्यालय याव्यतिरिक्त आता अंबरनाथ पालिकेने उभारलेल्या यूपीएससी सेंटरमध्येही २०० बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्या आनुषंगाने काम करण्याची सूचना खासदार  शिंदे यांनी दिले. या ठिकाणी ३० बेडचे आय सीयू सेंटरही उभारले जाणार आहे. हे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. 

अंबरनाथ नगरपालिकेने ५०० बेडचे रुग्णालय उभारले असले तरी या ठिकाणी आयसीयू कक्ष आणि व्हेंटिलेटरची कोणतीही सुविधा नाही, त्यामुळे अत्यावस्थेत असलेल्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही.  
ही समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेण्याची सूचना खासदार शिंदे यांनी केली आहे. 

बदलापूर पालिकेने सुरू केला ३० बेडचा आयसीयू कक्ष 
 

बदलापूर : बदलापूर नगरपालिकेने गौरी हॉल येथे उभारलेल्या २५० बेडच्या ऑक्सिजन कक्षात आता ३० बेडचा आयसीयू कक्ष उभारला आहे. त्यात ३० पैकी १० बेड हे व्हेंटिलेटरचे असतील. 
कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्या नेतृत्वाखाली हा कक्ष उभारण्यात आला आहे. ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर होत आहे, अशांवरही याठिकाणी उपचार केले जाणार आहेत. गौरी हॉल येथे रुग्णालय उभारल्यानंतर त्या काळात रुग्णांची संख्या घटली होती. बदलापूर पालिकेने या ठिकाणी उपचार सुरू ठेवल्याने आता त्याचा फायदा कोरोनाची दुसरी लाट आल्यावर झाला आहे.
     बदलापूर पालिकेने रेनी रिसॉर्ट येथील सभागृहात आणि जान्हवी लॉन्स येथील सभागृहात स्वतंत्र कोविड रुग्णालय उभारण्याची तयारीही सुरू केली आहे. त्या ठिकाणी बेडही उपलब्ध केले आहेत. रुग्ण वाढल्यावर या ठिकाणी स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

Web Title: coronavirus: 34 beds remaining at Kovid Hospital in Ambernath, need for separate arrangements for incremental patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.