Coronavirus : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४५१ रुग्ण सापडले; सहा जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 07:35 PM2021-01-06T19:35:17+5:302021-01-06T19:36:05+5:30

Coronavirus in Thane : जिल्ह्यात आता दोन लाख ४५  हजार ४०१ रुग्ण संख्या झाली असून सहा हजार मृत्यूची नोंद झालेली आहे. 

Coronavirus: 451 corona patients found in Thane district; Six people died | Coronavirus : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४५१ रुग्ण सापडले; सहा जणांचा मृत्यू 

Coronavirus : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४५१ रुग्ण सापडले; सहा जणांचा मृत्यू 

Next
ठळक मुद्देठाणे शहरात १४२ रुग्ण आढळून आले आहेत. यासह शहरात ५५ हजार १३८ रुग्णांची नोंद झाले.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ४५१ रुग्ण बुधवारी सापडले असून सहा जणांच्या मृत्यूचा झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ४५  हजार ४०१ रुग्ण संख्या झाली असून सहा हजार मृत्यूची नोंद झालेली आहे. 

ठाणे शहरात १४२ रुग्ण आढळून आले आहेत. यासह शहरात ५५ हजार १३८ रुग्णांची नोंद झाले. तर, तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३१८ झाली. कल्याण - डोंबिवलीत १२४ रुग्ण आढळून आले असून एकही मृत्यू झाला नाही. या शहरात आता ५८ हजार ३४ बाधीत असून एक हजार ११० मृत्यू झाले आहेत.

उल्हासनगरमध्ये १२  रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ४१२ बाधीत नोंदले असून मृत्यू संख्या ३६१ झाली आहे. भिवंडी परिसरात दोन रुग्ण सापडले अ3 मृत्यू नाही. येथे सहा हजार ६१९ बाधितांची तर, ३५२ मृतांची नोंद झाली आहे. मीरा भाईंदर शहरात ४५ रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे.या शहरात २५ हजार ६२० बाधितांस ७८७ मृतांची संख्या झालेली आहे. 

अंबरनाथला १४ रुग्णांचा शोध लागला असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता आठ हजार ३२६ बाधितांसह मृतांची संख्या ३०७ नोंदवण्यात आली आहे. बदलापूरला १३ रुग्ण आज सापडल्याने आठ हजार ९६३ बाधीत नोंदले गेले आहे. येथे एकही मृत्यू न झाल्याने मृत्यूची संख्या ११९ आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये १५ रुग्णांचा शोध लागला असून मृत्यू नाही. या गांवपाड्यांत आतापर्यंत १८ हजार ८२९ बाधीत झाले असून ५८२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Web Title: Coronavirus: 451 corona patients found in Thane district; Six people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.