CoronaVirus: ठाणे जिल्ह्यात ४५५ कोरोना रुग्ण; शहरात दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 03:13 AM2020-04-22T03:13:49+5:302020-04-22T03:14:12+5:30
मीरा-भाईंदरने गाठली शंभरी
ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांचा आलेख गेल्या काही दिवसांपासून चढताच असल्याचे दिसत आहे. मंगळवारी ही जिल्ह्यात ३१ रु ग्ण आढळून आले आहेत. तसेच जिल्ह्यात शंभरी गाठणारी मीरा-भाईंदरही ठाणे महापालिकेपाठोपाठची दुसरी महापालिका ठरली आहे. ठामपा क्षेत्रात सोमवार पाठोपाठ मंगळवारीही दोन पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या एकूण १७ झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची एकूण संख्या ही ४५५ इतकी झाली असून मंगळवारी नव्याने जे ३१ रुग्ण सापडले आहेत, त्यामध्ये सर्वाधिक १२ रुग्ण हे मीरा भार्इंदर येथे सापडले आहेत. यामुळे तेथील संख्या ही १०६ इतकी झाली आहे. तर कल्याण डोंबिवलीतही ७ नवे रु ग्ण आढळले असून तेथील रु ग्णांचा आकडा ८५ झाला आहे. यात डोंबिवलीत ४ तर ३ रुग्ण कल्याण रुग्ण मिळून आले आहेत. यामध्ये सहा महिन्यांच्या मुलीसह ६ महिलांचा समावेश आहे. तर एक ६२ वर्षीय पुरु ष आहे. ठामपात ७ आणि नवीमुंबईत ५ नवे रु ग्ण आढळून आले आहेत. ठामपातील रु ग्णांची संख्या ही १५५ झाली आहे तर नवी मुंबई येथील रु ग्णांची संख्या ७४ झाली आहे. त्याच बरोबर भिवंडीत दोन नवे रु ग्ण समोर आल्याने तेथील संख्या ही ५ झाली आहे. तर उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर तसेच ठाणे ग्रामीण येथे मंगळवारी एक ही रु ग्ण आढळून आलेला नाही.
१७ रुग्णांचा मृत्यू
ठाणे महापालिका हद्दीतील ७७ आणि ५८ वर्षीय अशा दोन पॉझिटिव्ह रु ग्ण असलेल्या महिलांचा सोमवारी रात्री आणि मंगळवारी दुपारी मृत्यू झाला आहे. एकीचा मृत्यू जिल्हा रु ग्णालयात तर दुसरीचा मृत्यू खासगी रु ग्णालयात झाला आहे. जिल्हा रु ग्णालयातील महिलेला रविवारी मध्यरात्री उपचारार्थ दाखल केले होते. मंगळवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या महिलेला १४ एप्रिल रोजी खासगी रु ग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे.
कल्याण-डोंबिवलीत सात नवे रुग्ण
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मंगळवारी सात नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिका हद्दीत बाधितांची संख्या ८५ झाली आहे. नवीन रुग्णांमध्ये डोंबिवली पश्चिमेतील सहा महिन्यांची बालिका, ३५ वर्षांची महिला, ६२ वर्षांचा वृद्ध, ५३ वर्षांचे गृहस्थ तसेच कल्याण पूर्वेतील २३ वर्षांचा तरुण, ३० वर्षांची आणि ४८ वर्षांची महिला यांचा सामवेश आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी २९ रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. आजमितीस एकूण ५३ रुग्ण उपचार घेत आहेत.
‘त्या’ नागरिकांनी क्वारंटाइन करावे!
कल्याण-शहराच्या पश्चिम भागातील रिलायन्स मार्ट येथे काम करणारा इसम १९ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या मार्टमध्ये १ ते २० एप्रिल दरम्यान काम करणाºया कर्मचारी व त्याठिकाणी गेलेल्या नागरिकांनी स्वत:ला होम क्वारंटाइन करुन घ्यावे. त्यांना सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळून आल्यास त्यांनी नजीकच्या तापाच्या दवाखान्यात अथवा महापालिका रुग्णालयात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
भिवंडीत दोन रु ग्ण पॉझिटिव्ह
भिवंडी : शहरातील वेताळपाडा येथील दोन महिलांचे कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे भिवंडीत रुग्णांची संख्या शहरात आता पाच, तर ग्रामीणमध्ये तीन अशी संख्या आठवर गेली आहे.
शहरातील वेताळपाडा येथे ५३ वर्षीय व्यक्ती मालेगाव येथून भिवंडीत आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर ठाणे सिव्हिल रु ग्णालयात पाठवले आहे. तसेच कुटुंबातील व्यक्तींना भिवंडी येथील क्वारंटाइन केंद्रात ठेवले आहे. वेताळपाडा परिसरही मनपाने सील केला होता. मालेगावहून आलेल्या व्यक्तीच्या घरातील त्याची ४५ वर्षीय पत्नी व २३ वर्षीय सून अशा दोघींचे अहवाल पॉझिटिव्ह आले,.
आतापर्यंत भिवंडीत कोरोनाने शिरकाव केला नव्हता. आता भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या वाढत आहे.
उल्हासनगरमध्ये एक रुग्ण सापडला
उल्हासनगर : मुंबई येथील खासगी रुग्णालयात काम करणाºया उल्हासनगरमधील एकाला लागण झाल्याचे उघड झाले आहे. महापालिका आरोग्य विभागाने त्याच्या पत्नीसह त्याच्या संपर्कात आलेल्या १५ पेक्षा जास्त जणांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. तसेच परिसरात तातडीने आरोग्य सर्वेक्षण सुरू केले आहे. या रुग्णाची मुंबई येथे नोंद असल्याची माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली.
देशातील सर्वाधिक घनतेचे शहर कोरोनामुक्त असल्याने सर्वत्र कौतुक होत होते. मात्र, आता मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात काम करणाºया व्यक्तीला कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. खबरदारी म्हणून पूर्वेतील एक भाग सील केला असून सर्वेक्षण सुरू केले आहे. तसेच, त्याच्या संपर्कात आलेल्या पत्नीसह १५ पेक्षा जास्त जणांना विलगीकरण केंद्रात ठेवल्याची माहिती पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दिली. या परिसरात फवारणी करून निर्जंतुकीकरण सुरू आहे.. यापूर्वी संसर्ग झालेली एकमेव महिला पूर्ण बरी झाली.