coronavirus: ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाच्या ४६१ रुग्णांची नोंद, तर १४ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 01:08 AM2020-12-09T01:08:14+5:302020-12-09T01:08:22+5:30
Thane coronavirus: ठाणे महानगरपालिका हद्दीत १०५ बाधितांची, तर ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या ५२ हजार ६९४, तर १२५७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ९५ रुग्णांची, तर ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
ठाणे : जिल्ह्यात कोरोना सध्या सापशिडीचा खेळ खेळत आहे. कधी रुग्णसंख्या वाढताना, तर कधी कमी होताना दिसत आहे. मंगळवारी ठाणे जिल्ह्यात ४६१ रुग्णांची तर १४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या २ लाख ३३ हजार ७८५, तर मृतांची संख्या आता ५ हजार ७६५ झाली आहे.
ठाणे महानगरपालिका हद्दीत १०५ बाधितांची, तर ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या ५२ हजार ६९४, तर १२५७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ९५ रुग्णांची, तर ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. कल्याण-डोंबिवलीत ११३ रुग्णांसह दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. मीरा-भाईंदरमध्ये ५३ रुग्णांची नोंद झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात २ रुग्णांची नोंद झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरमध्ये १८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अंबरनाथमध्येही १४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये ३० रुग्णांची नोंद करण्यात आली, तर चार जणांचा मृत्यू झाला आहे.