coronavirus: ठाणे जिल्ह्यात दिवसभरात 477 नविन रुग्णांची भर:  14 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 10:31 PM2020-06-07T22:31:33+5:302020-06-07T22:33:15+5:30

ठाणे महापालिका क्षेत्रात 7 जून रोजी 138 कोरोना बाधितांसह तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांचा आकडा चार हजार 57 तर, मृतांचा आकडा 116 वर पोहोचला.

coronavirus: 477 new cases in Thane district in a day: 14 deaths | coronavirus: ठाणे जिल्ह्यात दिवसभरात 477 नविन रुग्णांची भर:  14 जणांचा मृत्यू 

coronavirus: ठाणे जिल्ह्यात दिवसभरात 477 नविन रुग्णांची भर:  14 जणांचा मृत्यू 

Next

ठाणे - ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेने रविवारी कोरोनाबाधितांनी शंभरी पार केली. त्यामुळे जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 477 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. दरम्यान 14 रु ग्णांचा मृत्यु झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 11 हजार 359 तर, मृतांचा आकडा 366 इतका झाला आहे.

 ठाणे महापालिका क्षेत्रात 7 जून रोजी 138 कोरोना बाधितांसह तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांचा आकडा चार हजार 57 तर, मृतांचा आकडा 116 वर पोहोचला. त्यापाठोपाठ नवी मुंबई महापालिकेत 115 रु ग्णांची नोंद झाली. याठिकाणी एकाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधीतांचा आकडा दोन  हजार 886 तर, मृतांची संख्या 89 वर पोहोचली आहे. कल्याण डोंबिवलीत 29 रु ग्णांची नोंद झाली असून त्याठिकाणी दोघांचा मृत्यू झाला.

याठिकाणी एक हजार 418 कोरोनाबाधित असून  मृतांचा आकडा 40 झाला. तर मीरा भाईंदरमध्ये 34 नविन रु ग्णांच्या नोंदीसह चौघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या 983 तर, मृतांची संख्या 55 वर गेली आहे. भिवंडीमध्ये 18 रु ग्णांच्या नोंदीसह एकाच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची 261 तर, मृतांची संख्या 16  वर गेली. उल्हानगरमध्ये 83 रु ग्णांची नोंद झाली. तर तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रंनी दिली. याठिकाणी बाधितांची संख्या 579 तर, मृतांची संख्या 23 वर गेली आहे. बदलापूरमध्ये 17 रु ग्णांची  नोंद झाल्याने बाधितांची संख्या 309 झाली. तर, अंबरनाथमध्ये 33 रु ग्णांची नोंद झाली असून बाधितांचा संख्या 356 वर गेली आहे. ठाणे ग्रामीण भागात 10 रु ग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा संख्या 502 इतकी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: coronavirus: 477 new cases in Thane district in a day: 14 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.