coronavirus: ४८ तासांमध्ये ५० पोलिसांना झाला कोरोना, आठ पोलिसांवर घरीच सुरु आहेत उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 12:44 AM2020-07-06T00:44:15+5:302020-07-06T00:44:42+5:30
अवघ्या ४८ तासांमध्ये चार अधिकाऱ्यांसह ५० पोलीस कोरानामुळे बाधित झाले. आतापर्यंत ६३ अधिका-यांसह ६४३ पोलीस बाधित झाल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे. त्यामुळे एकीकडे बंदोबस्त करायचा की, कोरोनाशी लढा द्यायचा, अशी परिस्थिती पोलिसांमध्ये आहे. गेल्या अवघ्या ४८ तासांमध्ये चार अधिकाऱ्यांसह ५० पोलीस कोरानामुळे बाधित झाले. आतापर्यंत ६३ अधिकाºयांसह ६४३ पोलीस बाधित झाल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
आतापर्यंत कोरोनामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील एका महिला कर्मचाºयासह चार पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्हाभरात पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी चितळसर पोलीस ठाण्यातील एका कर्मचाºयाचा मृत्यू झाला. त्याचवेळी संपूर्ण आयुक्तालयात तीन अधिकारी आणि २३ कर्मचारी अशा २६ पोलिसांना ४ जुलै रोजी लागण झाली. यामध्ये चितळसरच्या चौघांचा समावेश आहे. तर कासारवडवलीतील एका उपनिरीक्षकासह तिघेजण बाधित झाले. बºयाच दिवसांच्या अंतराने वर्तकनगरच्या सहायक पोलीस निरीक्षकालाही बाधा झाली. याशिवाय, वागळे इस्टेट, शांतीनगर, टिळकनगर, विशेष शाखा, उल्हासनगर नियंत्रण कक्ष, कोळसेवाडी, निजामपुरा, नौपाडा आणि डायघर आदी पोलीस ठाण्यांमधील कर्मचाºयांचाही यात समावेश आहे. गेल्या ४८ तासांमध्ये ५० पोलीस बाधित झाले असून या सर्वांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
वेळेत उपचार केल्याने ४२१ जणांनी केली मात
आतापर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ६३ अधिकारी आणि ५८० कर्मचारी असे तब्बल ६४३ पोलीस बाधित झाले आहेत. सुदैवाने वेळीच उपचार घेऊन मनोधैर्य खचू न दिल्याने ४४ अधिकारी तसेच ३७७ कर्मचारी अशा ४२१ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ४६ कर्मचाºयांना घरी तर दोघांना केंद्रामध्ये क्वारंटाइन केले आहे.