coronavirus: मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे 53 कंत्राटी सफाई कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 06:30 PM2020-08-18T18:30:20+5:302020-08-18T18:32:14+5:30

मीरा भाईंदर महापालिकेने सफाई व आरोग्य विभागातील कायम आणि कंत्राटी अश्या सुमारे 1500 कर्मचाऱ्यांची एंटीजन तपासणी केली असता त्यात 53 कंत्राटी सफाई कामगार हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .

coronavirus: 53 contract cleaners of Mira-Bhayander Municipal Corporation tested corona positive | coronavirus: मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे 53 कंत्राटी सफाई कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

coronavirus: मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे 53 कंत्राटी सफाई कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

googlenewsNext


मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने सफाई व आरोग्य विभागातील कायम आणि कंत्राटी अश्या सुमारे 1500 कर्मचाऱ्यांची एंटीजन तपासणी केली असता त्यात 53 कंत्राटी सफाई कामगार हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .

मीरा भाईंदर शहरातील दैनंदिन साफसफाई चे काम कंत्राटी सफाई कामगारां मार्फत केले जाते . त्यामुळे सदर कंत्राटी कामगारां सह मुकादम आदी सफाई कामातील कर्मचाऱ्यांना व वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोना लागण चा धोका जास्त असल्याने त्यांची कोरोना चाचणी करून घेण्याची मागणी श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी पालिकेस सतत केली होती .

कोरोना मुळे कंत्राटी सफाई कामगार व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याच्या मृत्यूचा प्रकार घडला होता . उशिराने का होईना अखेर पालिकेने आरोग्य विभागातील कंत्राटी सफाई कामगार , मुकादम , स्वच्छता निरीक्षक आदी सुमारे दिड हजार कंत्राटी व कायम कारंचार्यांची गेले दोन दिवस एंटीजन टेस्ट चालवली होती . या तपासणीत 53 सफाई कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे .

कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने 53 कर्मचाऱ्यांना उपचारासाठी पालिकेच्या कोविड केअर रुग्णालयात दाखल केले आहे . त्यांच्या उपचाराच्या काळातील पगार पालिका कापणार नसल्याचे उपायुक्त डॉ . संभाजी पानपट्टे यांनी सांगितले

Web Title: coronavirus: 53 contract cleaners of Mira-Bhayander Municipal Corporation tested corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.