CoronaVirus: डोंबिवलीतील 67 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 04:49 PM2020-04-05T16:49:44+5:302020-04-05T16:51:06+5:30
उपचार घेत असताना काल 4 एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. तिला उच्च रक्तदाब व मधुमेहाचाही आजार होता.
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाग्रस्त 67 वर्षीय महिलेचा कस्तूरबा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. ती डोंबिवली पूर्व परिसरात राहत होती. या महिलेस 25 मार्च रोजी ताप आला होता. तसेच श्वास घेण्यास त्रस होत होता. ती उपचारासाठी खासगी रुग्णालयात गेली होती. तिला त्रस जास्त झाल्याने तिला कस्तूरबा रुग्णालयात चाचणीकरता पाठविले होते.तिची चाचणी पॉङिाटिव्ह आली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आली. उपचार घेत असताना काल 4 एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. तिला उच्च रक्तदाब व मधुमेहाचाही आजार होता. ही महिला परदेशातून आलेली नव्हती. मात्र तिच्या सानिध्यात चार जण आले होते. त्यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आजपासून ड्रोनचा वापर केला जाणार आहे. महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत दोन ड्रोन खरेदी करण्यात आाले आहेत. महापालिकेतील गर्दीची ठिकाणी हेरुन या दोन ड्रोन द्वारे गर्दीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. महापालिका मुख्यालयाच्या वॉररुममध्ये पब्लिक ऍड्रेस सिस्टीम लावली आहे. त्यातील स्पीकर्सच्या माध्यमातून मुखालयाय सर्व प्रभाग क्षेत्र कार्यालयासह महापालिका मुख्यालय, डोंबिवली विभागीय कार्यालय आणि शास्त्रीनगर रुग्णालयात गर्दी झालेल्या प्रभागात थेट उद्घोषणा करता येणे सोयीचे ठरणार अहे.