CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात दिवसभरात ६८८ रुग्णांची भर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 04:49 AM2020-06-15T04:49:10+5:302020-06-15T04:49:20+5:30
एकूण बाधितांची संख्या १५ हजार ६८३ तर मृतांची संख्या ५११
ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत रविवारी मोठी वाढ झाली. गेल्या २४ तासात ६८८ बाधितांची, तर १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १५ हजार ६८३ तर मृतांची संख्या ५११ झाली आहे. वाढत्या रुग्णांसोबतच मृतांची संख्या पाचशेच्या घरात गेली आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात १४ जून रोजी १३४ नव्या कोरोनाबाधितांची तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे येथील रुग्णसंख्या पाच हजार १३९ तर मृतांची संख्या १५८ वर पोहचली आहे. त्यापाठोपाठ नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही १६९ रुग्णांची तर चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे या शहरात बाधितांची संख्या तीन हजार ९१२ तर मृतांची संख्या ११८ वर गेली. कल्याण डोंबिवलीमध्ये नव्या ७८ रुग्णांची नोंद झाली. येथे तिघांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णसंख्या २,१४९ तर, मृतांची संख्या ६० वर पोहचली. मीरा भार्इंदरमध्ये ७९ रुग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या १,५९३ इतकी झाली. भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रात १0४ रुग्णांची नोंद नव्याने झाल्याने बाधितांची संख्या ५७४ इतकी झाली. उल्हासनगरमध्ये १८ नवे रुग्ण आढळले असून बाधितांची संख्या ७६0 झाली. अंबरनाथमध्ये ६३ रुग्णांसह एकाचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये १0 रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ४११ वर पोहचली. ठाणे ग्रामीण भागात ३३ रुग्णांची नोंद झाली.