गेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ७०७ रुग्ण सापडले; सहा जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 11:17 PM2021-03-09T23:17:06+5:302021-03-09T23:17:13+5:30
ठाणे शहरात २०५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६४ हजार ३५ झाली आहे. शहरात एक मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४०३ कायम आहे. कल्याण - डोंबिवलीत २१८ रुग्णांची आज वाढ झाली असून दोघांचा मृत्यू आहे.
ठाणे: गेल्या २४ तासात ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ७०७ रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ७१ हजार १६१ रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या सहा हजार ३१२ झाली आहे. (707 Corona patients found in Thane district in last 24 hours; Six people died)
ठाणे शहरात २०५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६४ हजार ३५ झाली आहे. शहरात एक मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४०३ कायम आहे. कल्याण - डोंबिवलीत २१८ रुग्णांची आज वाढ झाली असून दोघांचा मृत्यू आहे. आता ६५ हजार ७२ रुग्ण बाधीत असून एक हजार २०८ मृत्यूची नोंद आहे.
उल्हासनगरमध्ये १८ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. येथील बाधितांची संख्या ११ हजार ९९३ झाली. तर, मृतांचा आकडा ३७३ वर गेला आहे. भिवंडीला १० बाधीत आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. येथे एकूण बाधीतांची संख्या ६ हजार ८५६ असून मृतांची संख्या ३५६ आहे. मीरा भाईंदरमध्ये ७४ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधितांची संख्या २७ हजार ७१७ असून मृतांची संख्या ८०४ आहे.
अंबरनाथमध्ये १३ रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. येथे ९ हजार ९८६ जण बाधित असून ३१६ जणांचा मृत्यू झाला आहेत. बदलापूरमध्ये २२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीतांचा आकडा १० हजार २४१ झाला असून एकही मृत्यू नाही. मृत्यूची संख्या १२३ आहे. ग्रामीणमध्ये १२ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. येथे १९ हजार ७१८ बाधित असून आतापर्यंत ५९८ जणांचा मृत्यू झाला आहे.