coronavirus: ठाणे जिल्ह्यातील ७२० रुग्ण झाले ठणठणीत, नवी नियमावली ठरतेय फलदायी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 02:32 AM2020-05-13T02:32:17+5:302020-05-13T02:32:22+5:30

जवळपास ३३ टक्के बाधित हे कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. यात नव्या नियमांमुळे दोन दिवसांत तब्बल २७३ बरे झाले आहेत.

coronavirus: 720 patients in Thane district beat Coronavirus, new regulations are becoming fruitful | coronavirus: ठाणे जिल्ह्यातील ७२० रुग्ण झाले ठणठणीत, नवी नियमावली ठरतेय फलदायी

coronavirus: ठाणे जिल्ह्यातील ७२० रुग्ण झाले ठणठणीत, नवी नियमावली ठरतेय फलदायी

Next

ठाणे : गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ठाणे जिल्ह्यातील बाधितांनी सव्वादोन हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे जिल्हा रेड झोनमधून बाहेर पडण्याची शक्यता धुसर आहे. मात्र, दुसरीकडे बाधितांपैकी ७२० बाधित हे आता औषधोपचार घेऊन ठणठणीत बरे झाल्याने घरी परतले आहेत.

जवळपास ३३ टक्के बाधित हे कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. यात नव्या नियमांमुळे दोन दिवसांत तब्बल २७३ बरे झाले आहेत. कोरोनामुक्त रुग्णांत ठामपामधील २०० तर केडीएमसी, नवी मुंबई आणि मीरा-भार्इंदर येथे सव्वाशे ते दीडशेच्याही पुढील रेषा ओलांडली
असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे.

ठाणे जिल्ह्यात सहा महानगरपालिका आणि दोन नगरपालिका तसेच जिल्हा परिषद अस्तित्वात आहे. शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागांत जिल्हा विभागाला गेला आहे. शहापूर-मुरबाड या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकवस्ती असून, शहरी भाग हा दाटीवाटीने पसरलेला आहे. त्यातच परराज्यातून आलेल्या लोकांची संख्याही जास्त असून नोकरदारांची संख्या अधिक आहे. ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात (लाखोंनी) नागरिक लोकलने दररोज ये-जा करतात. त्यामुळे ही रेल्वे असो, या एसटी स्थानक, गर्दीने गजबजलेली असतात.

शहरी भागात म्हणजे ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि मीरा-भार्इंदर या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला असून शहरी भागाच्या तुलनेने ग्रामीण भागात राहून मुंबई, वाशी आणि ठाणे या ठिकाणी नोकरीसाठी जाणाऱ्या शासकीय नोकरदारवर्गाला कोरोनाची लागण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. या नोकरदारांमुळे ग्रामीण भागात कोरोना हातपाय पसरू लागला आहे.

जिल्ह्यातील दोन हजार ३७८ जण बाधित आढळून आले असून ६६ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यामधील 720 जण कोरोनामुक्त झाल्याने घरी परतले.

या घरी परतणाºया रुग्णांमध्ये ठामपामध्ये सर्वाधिक 224 जणांचा समावेश आहे. त्यामध्ये सोमवारी एकाच दिवशी शंभर जण घरी परतले आहेत.

सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या नवी मुंबईत १६९ कोरोनामुक्त झाले आहेत. केडीएमसीत १३०,मीरा- भार्इंदर १४७, बदलापूर २१, ठाणे ग्रामीण १३, अंबरनाथ ७, भिवंडी ५ तसेच उल्हासनगर ४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

केंद्र मंत्रालयाच्या नव्या नियमावलीनुसार उपचार कालावधीत सुधारणा केल्याने रविवारी आणि सोमवारी तब्बल 273 जण रुग्णांतून घरी परतले आहेत.

जरी रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल बाधित रुग्ण ही मोठ्या प्रमाणात येत्या काही दिवसांत घरी जातील. मात्र, नागरिकांनी जास्तीत जास्त स्वत:ची काळजी घ्यावी, तसेच त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

Web Title: coronavirus: 720 patients in Thane district beat Coronavirus, new regulations are becoming fruitful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.