CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ७५ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 04:22 AM2020-08-09T04:22:50+5:302020-08-09T04:23:00+5:30

नव्या १५६६ रुग्णांची वाढ; आरोग्य विभागाची माहिती

CoronaVirus 75 corona deaths in Thane district on Saturday | CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ७५ मृत्यू

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ७५ मृत्यू

Next

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाने ७५ जणांचा मृत्यू झाला. तर, एक हजार ५६६ नव्या रुग्णांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंंख्या ९६ हजार ९६० झाली असून मृतांचा आकडा दोन हजार ७१८ झाला.

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे २८८ रुग्ण नव्याने आढळल्याने बाधितांची संख्या २१ हजार ८०२ वर पोहोचली आहे. चार जणांच्या मृत्यूने आतापर्यंत मृतांची संख्या ६९२ झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ३०९ रुग्णांसह १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे आतापर्यंत २२ हजार १५५ रुग्ण बाधित झाले असून मृतांची संख्या ४३१ झाली आहे.

भिवंडी महापालिका क्षेत्रात १९ बाधित आढळून आले. तर, तब्बल ४० जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत येथे बाधितांची संख्या तीन हजार ७५६ झाली असून मृतांची संख्या २५८ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १९९ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद शनिवारी करण्यात आली. अंबरनाथमध्ये ६३ नवे रुग्ण वाढले असून एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या चार हजार १८२ तर, मृतांची १६५ आहे. बदलापूरमध्ये ६७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार १३ झाली. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात १२१ रुग्णांची वाढ तर चार मृत्यू झाले आहेत.

वसई-विरारमध्ये सात रुग्णांचा मृत्यू
वसई-विरार शहरात शनिवारी २१६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, मात्र त्याच वेळी सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या १३ हजार २८७ वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे १२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आजवर पालिका हद्दीतील १० हजार ८३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे.

वसई-विरार शहर महापालिका हद्दीत शनिवारी दिवसभरात सात रुग्णांनी आपले प्राण गमावले. यात वसई-१, विरार-२ आणि नालासोपारामधील
४ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे आजवर जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या २७७ झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात आढळलेल्या २१६ रुग्णांमध्ये वसई-७३, वसई-विरार-४, नायगाव-४, नालासोपारा-७० आणि विरार-६५ रुग्णांचा समावेश आहे.

नवी मुंबईमध्ये ४५५ रुग्ण वाढले
नवी मुंबई : शहरात दिवसभरात ४५५ रुग्ण वाढले असून एकूण रुग्णांची संख्या १८,१४९ झाली आहे. महानगरपालिका प्रशासनाने चाचण्याची संख्या वाढविली आहे. आतापर्यंत ३६,४४३ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या असून ३२,२२८ अँटिजेन चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात ५२१ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत तब्बल १४,०७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी सात जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ४६१ झाला आहे.

Web Title: CoronaVirus 75 corona deaths in Thane district on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.