CoronaVirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे ८ नवे रुग्ण; नर्स, बँक कर्मचारी व परिवहन ड्रायव्हरचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 04:04 PM2020-04-27T16:04:12+5:302020-04-27T16:42:00+5:30

CoronaVirus : मोहने परिसरातील सात वर्षाची मुलगी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने तिला कोरोना झाला आहे.

CoronaVirus: 8 new corona patients in Kalyan-Dombivali; Including nurses, bank staff and transport drivers rkp | CoronaVirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे ८ नवे रुग्ण; नर्स, बँक कर्मचारी व परिवहन ड्रायव्हरचा समावेश

CoronaVirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे ८ नवे रुग्ण; नर्स, बँक कर्मचारी व परिवहन ड्रायव्हरचा समावेश

googlenewsNext
ठळक मुद्देमोहने परिसरातील सात वर्षाची मुलगी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने तिला कोरोना झाला आहे. मुंबईतील सरकारी परिवहन सेवेतील 38 वर्षीय ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे 8 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 137  झाली आहे. नव्या रुग्णांमध्ये सात वर्षाच्या मुलीसह नर्स, परिवहनचा ड्रायव्हर आणि बँक कर्मचा-याचा समावेश आहे.

मोहने परिसरातील सात वर्षाची मुलगी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने तिला कोरोना झाला आहे. मोहने येथील 32 वर्षाची महिला कोरोना बाधित आहे. मुंबईतील सरकारी परिवहन सेवेतील 38 वर्षीय ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे. डोंबिवली पश्चिमेत राहणा-या 40 वर्षीय नर्सला कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबईतील खाजगी बँकेत काम करणा-या कल्याण पश्चिमेत राहणा-या 21 वर्षीय तरुणाला कोरोना झाला आहे.

कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 13 वर्षीय मुलाला कोरोना झाला आहे. हा मुलगा डोंबिवली पश्चिमेत राहतो. त्याचबरोबर कल्याण पूर्वेतील 34 वर्षीय पुरुषाला कोरोना झाला आहे. तो खाजगी रुग्णालयातील कर्मचारी आहे. डोंबिवली पश्चिमेतील 48 वर्षीय महिलेला कोराना झाला आहे.

आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांपैकी 45 जणांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. या 45 जणांनी कोरोनाविरुद्ध युद्ध जिंकले आहे. त्यामुळे त्यांचा जीव बचावला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या कोराना रुग्णांची संख्या 89 आहे. त्यांच्यावर विविध रुग्णात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 4 हजार 998 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. 98 जण हे संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

Web Title: CoronaVirus: 8 new corona patients in Kalyan-Dombivali; Including nurses, bank staff and transport drivers rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.