CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात ८४५ नव्या रुग्णांची नोंद; ३0 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 02:30 AM2020-06-19T02:30:06+5:302020-06-19T02:30:22+5:30
कल्याण, डोंबिवलीमध्ये गुरुवारी सर्वाधिक २0९ रुग्णांची नोंद, तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने रुग्णसंख्या २ हजार ७७९ तर, मृतांची संख्या ६८ झाली.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात गुरुवारी रुग्णसंख्येत ८४५ ने वाढ, तर ३0 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १८ हजार ६६३ तर मृतांची संख्या ६२५ झाली आहे.
कल्याण, डोंबिवलीमध्ये गुरुवारी सर्वाधिक २0९ रुग्णांची नोंद, तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने रुग्णसंख्या २ हजार ७७९ तर, मृतांची संख्या ६८ झाली. ठाणे पालिका हद्दीत १६४ बाधितांची तर, सात जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ५ हजार ७६९ तर, मृतांची संख्या १८२ वर गेली आहे. भिवंडी पालिका क्षेत्रात ४0 बाधितांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ७२७ तर, मृतांची संख्या ५८ वर पोहोचली. मीरा भार्इंदरमध्ये ६८ रुग्ण तर चार जणांच्या मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या १ हजार ९५0 तर, मृतांची संख्या ९४ आहे. उल्हासनगरात ५२ रुग्णांमुळे बाधितांची संख्या ९0४ झाली आहे. अंबरनाथमध्ये ६९ रुग्ण तर, एकाचा मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या ९१५ तर, मृतांची संख्या २२ झाली आहे. बदलापुरात २६ रुग्णांमुळे बाधितांची संख्या ४७४ झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात बाधितांची संख्या ७५४ वर गेली आहे.
वसई-विरारमध्ये ५ रुग्णांचा मृत्यू
वसई-विरारमध्ये गुरुवारी ५ रुग्णांचा मृत्यू झाला तर ८४ रुग्ण वाढले. बाधितांची संख्या १,८४५ झाली आहे. तर, १२० रुग्णांनी मात केली आहे.