coronavirus: ‘कोरोना’ व्यतिरिक्त, लॉकडाऊन काळातील तणाव हाही एक मुख्य धोका, सर्वेक्षणातून झाले उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 03:22 PM2020-07-16T15:22:38+5:302020-07-16T15:48:18+5:30
कोरोनाची साथ व टाळेबंदी यांच्यामुळे बेरोजगारी, वेतन कपात आणि सक्तीने घरातूनच काम करणे ही परिस्थिती सर्वांवर ओढवली असल्याने अनेकांना आरोग्याचे प्रश्न भेडसावू लागले आहेत.
ठाणे - ‘कोविड-१९’ च्या प्रादुर्भावामुळे सर्व देशांतील अर्थव्यवस्थांवर व उद्योगांवर विपरीत परिणाम झाला आहे. मानांकन, संशोधन आणि जोखीम व धोरण सल्लागार सेवा देणाच्या ‘क्रिसिल’ या भारतीय विश्लेषक कंपनीच्या मतानुसार, स्वातंत्र्यानंतर आलेली ही भारतातील चौथी आर्थिक मंदी आहे; आर्थिक उदारीकरणानंतरची ही पहिली मंदी आहे, तर कदाचित आतापर्यंतची ही सर्वात वाईट मंदी ठरणार आहे. कोरोनाची साथ व टाळेबंदी यांच्यामुळे बेरोजगारी, वेतन कपात आणि सक्तीने घरातूनच काम करणे ही परिस्थिती सर्वांवर ओढवली असल्याने अनेकांना आरोग्याचे प्रश्न भेडसावू लागले आहेत. यामध्ये पुरेशी झोप न लागणे, पाठदुखी, थकवा, तणाव, चिंता आणि काहीजणांमध्ये संतापाची भावना या समस्यांचा समावेश आहे.
यातील संतापाची भावना खरेच अस्तित्वात असल्याचा निर्वाळा ‘टाटा सॉल्ट लाइट’ या एका सर्वेक्षणाने दिला आहे. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की काम आणि तंत्रज्ञान यांच्याबद्दलच्या संतापाला पुरुष अधिक प्रमाणात बळी पडतात. कामासंबंधीच्या तणावामुळे २० टक्के स्त्रियांमध्ये मोठा तणाव असतो, तथापि सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की अकल्पित स्वरुपाची कामे आणि तंत्रज्ञानाशी संबंधित अडचणींना तोंड देताना पुरुषच जास्त संतापतात. सक्तीने काम करायला भाग पाडले, तर आपल्या संतापाचा स्फोट होतो, अशी कबुली ६४ टक्के पुरुषांनी दिली आहे, तर ही कबुली देणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण ५८ टक्के आहे. या सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की, तरुणाई (जनरेशन झेड - १८ ते २५ वर्षे वयोगटातील व्यक्ती) ही तंत्रज्ञानातील किरकोळ व्यत्ययांमुळेदेखील आपला तोल गमावते, त्या तुलनेत ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती संतुलन राखून असतात. तरुणाईतील ६ जणांपैकी १, म्हणजे १६ टक्के व्यक्ती कबूल करतात, की तंत्रज्ञानाशी संबंधित समस्या हे त्यांच्या तणावाचे प्रमुख कारण आहे. ४५ वर्षांपुढील वयाच्या व्यक्तींमध्ये हे प्रमाण १२ टक्के आहे.
आत्यंतिक तणावाच्या काळातही शांत व सकारात्मक कसे राहावे, याचे काही उपाय टाटा न्यूट्रीकोर्नरच्या न्यूट्रिशन तज्ज्ञ कविता देवगण यांनी सुचविले आहेत. त्या म्हणतात, ‘’उच्च रक्तदाब हा शहरातील नागरिकांमध्ये, विशेषतः पुरुषांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा आजार आहे. तो टाळण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करण्याची गरज आहे. आपण घरातून काम करीत असू, तर अधूनमधून खुर्चीतून उठणे किंवा दर एका तासाने फिरून येणे आवश्यक आहे. रेस्टॉरंट्समधून जेवण मागविण्यापेक्षा घरीच पारंपरीक पदार्थ बनवावेत. जलद चालणे, योगासने, जलतरण यांसारखे व्यायाम करावेत. रात्री ६ ते ८ तास झोप घेणेही आवश्यक आहे.’’
‘कोविड-१९’ उद्रेकामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत ग्राहकांच्या खरेदीचे स्वरुपही बदलले आहे. ‘अॅक्सेन्चर’ च्या संशोधन अहवालानुसार, खरेदी करण्याची आपली सवय कायमची बदलण्याची ग्राहकांना गरज वाटत आहे. अन्न मर्यादित आणि आरोग्यपूर्ण वस्तूंची जाणीवपूर्वक खरेदी करणे या दोन प्राधान्याच्या बाबी झाल्या आहेत. सोयीस्कर, साठवणुकीस सोप्या आणि आरोग्य व पोषणासाठी योग्य अशा उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी वाढली असल्याचे एफएमसीजी कंपन्यांचे निरीक्षण आहे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीच्या भारतातील पॅकेज्ड फूड्स विभागाच्या प्रेसिडेंट रिचा अरोरा यांनी स्पष्टीकरण दिले की, “कोविड-१९ च्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर, घरगुती शिजवलेल्या जेवणाला, विशेषतः निरोगी व पौष्टिक अशा पारंपरीक भारतीय पदार्थांना मागणी वाढली असून त्या अनुषंगाने ग्राहकांच्या सवयीही बदलल्या आहेत. ‘रेडी-टू-कूक न्यूट्रीमिक्स’ पदार्थ, उदा. सहा धान्ये असलेली ‘खिचडी मिक्स’, ‘मल्टीग्रेन चिल्ला मिक्स’ यांना प्रचंड मागणी वाढली आहे."