coronavirus: कर्मचाऱ्यांच्या मुंबईतील निवास व्यवस्थेचे प्रयत्न - एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 03:22 AM2020-05-16T03:22:42+5:302020-05-16T03:23:40+5:30
बदलापूरमध्ये नगरपालिका आणि शिवसेना यांच्या वतीने १०० बेडचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन नगरविकासमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.
बदलापूर : कल्याण असो की बदलापूर, या शहरांत वाढणारे कोरोना रुग्ण हे मुंबईत कामाला जाणा-या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वाढत असल्याचे समोर आले आहे. या शहरातील कोरोनावर नियंत्रण मिळवायचे असेल, तर मुंबईत जाणा-या कर्मचा-यांची व्यवस्था तेथेच व्हावी, या हेतूने आमचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. त्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केला.
बदलापूरमध्ये नगरपालिका आणि शिवसेना यांच्या वतीने १०० बेडचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन नगरविकासमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. बहुसंख्य कोरोनाग्रस्त रुग्ण हे मुंबईत नोकरीसाठी जाणाºया कर्मचाºयांच्या माध्यमातून वाढत आहेत. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांत कोरोनाचा प्रभाव वाढण्यामागे मुंबईत काम करणारे कर्मचारी आहेत, असे म्हटले जात असले तरी हे कर्मचारी जीवावर उदार होऊन आपली सेवा देत आहेत. त्यांच्यामुळेच आज मुंबई कोरोनाशी लढा देत आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथून मुंबईत काम करण्यासाठी जाणाºया कर्मचाºयांची योग्य व्यवस्था मुंबईतच करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, असे ते म्हणाले.