Coronavirus: तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहा, केंद्रीय समितीच्या महापालिकांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 06:35 PM2021-07-15T18:35:54+5:302021-07-15T18:36:25+5:30

Coronavirus: महाराष्ट्र राज्याचे कोविड-१९ नोडल अधिकारी तथा गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे उपसंचालक डॉ.अजित शेवाळे यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन  शर्मा यांच्यासमवेत ठाणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची पाहणी केली.

Coronavirus: Be prepared by the health system for the third wave, instructions to the Municipal Corporation of the Central Committee | Coronavirus: तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहा, केंद्रीय समितीच्या महापालिकांना सूचना

Coronavirus: तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहा, केंद्रीय समितीच्या महापालिकांना सूचना

Next

ठाणे  : कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असला तरी नागरीकांकडून मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन न होणो असे प्रकार होताना दिसत आहेत. त्यामुळे अशा पृवत्तीमुळे कोरोना वाढण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे अशा नागरिकांवर, आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना केंद्रीय आरोग्य पथकाने ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना दिल्या आहेत. तसेच शहरात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी गाफिल राहू नका आणि तिसरी लाट येणारच हे गृहीत धरुन आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा अशा सुचनाही या समितीने केल्या आहेत. ( Be prepared by the health system for the third wave, instructions to the Municipal Corporation of the Central Committee)

महाराष्ट्र राज्याचे कोविड-१९ नोडल अधिकारी तथा गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे उपसंचालक डॉ.अजित शेवाळे यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन  शर्मा यांच्यासमवेत ठाणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची पाहणी केली.  तसेच कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे ठाणे महापालिकेसह जिल्ह्यातील इतर महापालिकेने कोव्हीड-१९ चा सामना करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, यांच्यासह इतर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

या बैठकीत तिसऱ्या लाटेसाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कशी सज्ज आहे, याची माहिती विविध महापालिकांच्या आरोग्य अधिकाऱ्यांना  दिली. दरम्यान यावेळी केंद्रीय समितीने देखील काही महत्वाच्या सुचना महापालिकांना दिल्या. दुसऱ्या  लाटेदरम्यान आरोग्य यंत्रणोतील काही उणीवा समोर आल्या होत्या. ऑक्सीजनचा तुटवडा, बेडची अपुरी पडणारी संख्या, औषधांचा अपुरा पुरवठा, अशामुळे रुग्णांना त्याचा फटका बसला होता. परंतु आता तिसऱ्या  लाटेत कोणत्याही प्रकारे गाफील राहू नका अशा सुचना केंद्रीय समितीने दिल्या. दुसऱ्या  लाटेत जाणवलेल्या सर्व उणीवा दूर करण्यावर भर द्या, ऑक्सीजनचा पुरवठा सज्ज ठेवा, अतिरिक्त बेडची निर्मिती करा, औषधांचा पुरेसा साठा आधीच घेऊन ठेवा अशा सुचनाही त्यांनी दिल्या. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि तरु णांची मदत घेऊन त्यांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद वाढवून जनजागृती करण्यात यावी तसेच केवळ तंत्रज्ञानावर भर देऊ नका तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करा, अशा सुचनाही त्यांनी केल्या आहेत. याशिवाय जे नागरीक सोशल डिस्टेसींगचे पालन करीत नसतील तसेच मास्कचा वापर करीत नसतील अशांवर कारवाई करा अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

ठाणे शहरातील जवळचे उपलब्ध रुग्णालय, उपलब्ध बेड्स, तसेच अत्यावश्यक रुग्णवाहिका आदी माहिती नागरिकांनी तात्काळ मिळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविड वॉर रूमला केंद्रीय पथकाने  भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पोस्ट कोव्हीड सेंटरला भेट देवून सेंटरची माहिती घेवून महापालिकेच्या संसर्गरोग तपासणी प्रयोगशाळेला भेट दिली. महापालिकेच्यावतीने व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून केंद्रीय पथकाने पोस्ट कोव्हीड लसीकरण केंद्राची देखील पाहणी केली. तसेच कोविड रूग्णालयांना तसेच खासगी कोविड रूग्णालयांना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रयत्न करण्यात आले असून पार्किंग प्लाझा येथील एफडीए प्रमाणित राज्यातील पहिल्या ऑक्सिजन प्रकल्पाला त्यांनी भेट देवून महापालिकेच्या संपूर्ण यंत्रणेबद्दल समाधान व्यक्त केले.

ठाणे महापालिकेने संभाव्य तिसऱ्या  लाटेचा सामना करण्यासाठी ग्लोबल आणि पार्कीग प्लाझा रु ग्णालयात ऑक्सीजनची व्यवस्था केली आहे. व्होल्टास रु ग्णालयातही प्राणवायुचा पुरवठा केला जाणार आहे. तिस:या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे लहान मुलांसाठी पार्कीग प्लाझा रु ग्णालयात १०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. ५० खाटा ऑक्सीजनच्या तर २५ खाटा अतिदक्षता विभागात आहेत. याशिवाय, २५ व्हेंटीलेटर खाटांचीही व्यवस्था केली आहे. लहान मुलांसोबत त्यांच्या पालकांना तिथे राहण्याची व्यवस्था केली आहे. लहान मुलांसाठी लागणारी औषधे आणि इतर जीवनावश्यक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. कोरोना नियंत्रण कक्षही सक्षम केला असून एका क्र मांकावरून एकाचवेळी २० कॉल स्विकारले जातील, अशी यंत्नणा उभारली असल्याची माहिती आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केंद्रीय समितीपुढे सादर केली.

Web Title: Coronavirus: Be prepared by the health system for the third wave, instructions to the Municipal Corporation of the Central Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.