coronavirus: भिवंडीत काळाबाजार करणाऱ्यांचे पोलिसांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 02:28 AM2020-07-07T02:28:12+5:302020-07-07T02:28:35+5:30

लॉकडाऊनच्या काळात शहरात एकाने व्हिडीओ क्लिप बनवली व भिवंडी पोलिसांना कारवाईचे आव्हान देत गुटखा व तंबाखू सिगारेट विकला. यावरून हा काळाबाजार करणाऱ्यांचे हात किती वरपर्यंत पोहोचले आहेत, याचा अंदाज येतो.

coronavirus: Bhiwandi black marketeers challenge police | coronavirus: भिवंडीत काळाबाजार करणाऱ्यांचे पोलिसांना आव्हान

coronavirus: भिवंडीत काळाबाजार करणाऱ्यांचे पोलिसांना आव्हान

Next

- नितीन पंडित
भिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण भागात लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात गुटखा तंबाखू व सिगारेट विकला गेला. विशेष म्हणजे ग्रामीण भागासह शहरात दाटीवाटीच्या व मुस्लिमबहुल परिसरात मुख्यत्वे ही विक्री झाली. आता पुन्हा याच परिसरात हा गोरखधंदा फोफावेल, अशी शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरात एकाने व्हिडीओ क्लिप बनवली व भिवंडी पोलिसांना कारवाईचे आव्हान देत गुटखा व तंबाखू सिगारेट विकला. यावरून हा काळाबाजार करणाऱ्यांचे हात किती वरपर्यंत पोहोचले आहेत, याचा अंदाज येतो. ही क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने भिवंडी पोलिसांच्या अब्रुची लक्तरे वेशीला टांगली गेल्याने परिसरातील तंबाखू, गुटखा सिगारेट विकणाºयांना पकडून चांगलाच चोप दिला. लॉकडाऊन काळात सर्वाधिक गुटखा व तंबाखू भिवंडीत विकला गेला. कारण भिवंडीतील अनेक गोदामांमध्ये गुटखा, तंबाखु व तंबाखू जन्य पदार्थांची साठवणूक मोठ्या प्रमाणात केली जाते. लॉकडाऊनच्या काळात तब्बल तीन वेळा भिवंडीत अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला होता. त्यात लाखोंचा गुटखा व तंबाखू जप्त करण्यात आला होता. एका कारवाईत तर चक्क सॅनिटायझरच्या कंटेनरमधून गुटखा जप्त करण्यात आला होता.

  गुटखा, तंबाखूची गोदामे असल्याने गोरखधंद्याचे ठरले केंद्र

लॉकडाऊनमध्ये पानटपºया बंद असल्या तरी अनेक पानटपरीधारकांनी फोनद्वारे आपला गुटखा, तंबाखू विकण्याचा धंदा सुरूच ठेवला होता. या काळात चढ्या दराने गुटखा व तंबाखू , सिगारेटची विक्र ी झाली.
लॉकडाऊन अगोदर जे सिगारेट पाकीट २० ते ३० रु पयांना मिळत होते ते भिवंडीत 300 रु पयांना विकले गेले.
तर तंबाखूची सात रु पयाला मिळणारी पुडी 40-50 रु पयांना विकली गेली.
१०रु पयाची सुटी तंबाखू ३५ रु पये दराने विकली गेली.
त्याचबरोबर १० रुपयांचा गुटखा लॉकडाऊनमध्ये 20 रु पयाला विकला गेला.
सात रु पयांचा गुटखा 20 रुपये दराने विकला गेला.
१० रु पयाला मिळणारा गुटखा 30 रु पयाला महागडा गुटखा जो अगोदर २५ रु पयाला मिळायचा तो 60 रु पये दराने विकला गेला.
आता पुन्हा तसेच सुगीचे दिवस येणार या कल्पनेने विक्रेते काळाबाजार करू लागले आहेत. लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय बंद असल्याने अनेकांनी फोनवर व ग्राहकांना स्वत: भेटून गुटखा व तंबाखू चढ्या दराने विकला व त्याचा लॉकडाऊन काळात व्यवसाय म्हणून उपयोग केला.

Web Title: coronavirus: Bhiwandi black marketeers challenge police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.