CoronaVirus News: "आयुक्तांची बदली करण्याऐवजी दोन्ही मंत्र्यांना पदांवरून दूर करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 03:42 PM2020-06-24T15:42:17+5:302020-06-24T15:44:29+5:30

भाजप आणि मनसे झाली आक्रमक; अपयश झाकण्यासाठी आयुक्तांची बदली केल्या आरोप

CoronaVirus bjp mns hits out at shiv sena ncp over commissioners transfer | CoronaVirus News: "आयुक्तांची बदली करण्याऐवजी दोन्ही मंत्र्यांना पदांवरून दूर करा"

CoronaVirus News: "आयुक्तांची बदली करण्याऐवजी दोन्ही मंत्र्यांना पदांवरून दूर करा"

Next

ठाणे  : ठाणे  महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांच्या बदलीवरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोरोनाचे अपयश झाकण्यासाठीच आयुक्तांची बदली करण्यात आल्याचा आरोप आता भाजप आणि मनसेने केले आहे. वास्तविक पाहता हे नगरविकास विभागाचे अपयश असून त्यांनी ही जबाबदारी स्विकारणे  अपेक्षित आहे. तसेच ठाण्यातील दोनही मंत्र्यांचे हे अपयश असून त्यांचे मंत्रीपद काढावे असा सुर आता या दोनही पक्षांनी लावला आहे.

ठाणे शहरासह जिल्ह्यातील इतर महापालिका भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यानुसार उल्हासनगर आणि मिराभाईंदर महापालिकेच्या आयुक्तांची बदली करण्यात आली. तर रात्री उशिरा ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांचीही बदली करण्यात आली. कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. परंतु आता यावरुन राजकारण चांगलेच तापू लागले आहे. भाजप आणि मनसेने या बदलीच्या निमित्ताने यात उडी घेतली आहे.  कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबईत आयुक्त बदललेत, तर मग ठाण्यात पालकमंत्नी बदलणार का?, या भाजपा नेते आशिष शेलार यांच्या सवालाची दखल घेऊन, राज्य सरकारने ठाणो महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांची तडकाफडकी बदली करून, पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मोकळे सोडले, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी ट्विटरद्वारे केली आहे. ठाणो महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांची अवघ्या 3 महिने 3 दिवसांत ठाण्यातून बदली करण्यात आली. ठाणो महापालिका क्षेत्रत कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आयुक्तांनाच जबाबदार धरण्यात आले. परंतु त्यांच्या बरोबर यामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे देखील तितकेच जबाबदार असल्याचा आरोप डावखरे यांनी केला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात कोरोनाचे मोठ्या संख्येने रु ग्ण आहेत. महापालिकेकडून मुंब्रा येथील मृतांची नोंद कमी केली जाते. आपल्या स्वत:च्या मतदारसंघात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात दोन्ही मंत्री अपयशी ठरले. मात्र, त्यांना महाविकास आघाडी सरकारने अभय का दिले असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नगरसेवक  नारायण पवार यांनी देखील या दोनही मंत्र्यांवर टिका करतांना हे पालिकेला दोष देताना या दोघांचीही जबाबदारी तितकीच महत्वाची होती. परंतु आपले अपयश झाकण्यासाठीच आयुक्तांची बदली करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महापालिकेतील काही विशिष्ट अधिका:यांच्या लॉबीच्या हितसंबंधांचा फटका देखील मावळत्या आयुक्तांना बसल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

भाजप पाठोपाठ मनसेने देखील या बदलीवरुन सत्ताधाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आयुक्तांच्या बदली आड आपले अपयश झाकण्याचा सत्तधाऱ्यांचा प्रयत्न असल्याची टिका केली आहे. जिल्ह्यातील चार आयुक्तांच्या मंगळवारी बदली करण्यात आल्या आहेत. सरकार फेल झाल्याने कोणाच्या तरी माथी हे अपयश मारायचे म्हणून या चार बदल्या करण्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आयुक्त अपयशी ठरत असेल तर संपूर्ण प्रशासन त्याला जबाबदार असतात. याला जबाबदार म्हणून ठाणे  जिल्ह्याचे पालकमंत्री देखील असून मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. नवीन रुग्णालयात साहित्यांचा तुटवडा असे असतांना हे अपयश हे या नेत्यांचे आहे. प्रशासनाच्या माथी मारुन जमणार नाही तर हे अपयश सरकारचे आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: CoronaVirus bjp mns hits out at shiv sena ncp over commissioners transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.