Coronavirus Break The Chain : ठाण्यातील अत्यावश्यकसह इतर दुकाने १ जूनपासून उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 06:17 PM2021-05-31T18:17:08+5:302021-05-31T18:22:43+5:30

ठाणे  महापालिकेची स्वतंत्र नियमावली जाहीर. महानगपालिकेनं वेळ दिली ठरवून

Coronavirus Break The Chain Other than essentials shops in Thane will be open from June 1 | Coronavirus Break The Chain : ठाण्यातील अत्यावश्यकसह इतर दुकाने १ जूनपासून उघडणार

प्रातिनिधीक छायाचित्र

googlenewsNext
ठळक मुद्देठाणे  महापालिकेची स्वतंत्र नियमावली जाहीर.महानगपालिकेनं वेळ दिली ठरवून

ठाणे  : राज्य शासनाने ज्या शहरांचा रुग्वाढीचा दर हा १० टक्यांपेक्षा कमी असेल अशा ठिकाणी महापालिकांची स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून घोषणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने ठाणे महापालिकेने पावले उचलली असून निर्बंधांसंदर्भात स्वतंत्र नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार मॉल, शॉपिंग सेंटर वगळता इतर आस्थापना १ जूनपासून म्हणजेच मंगळवार पासून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेर्पयत खुली ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आला आहे. परंतु शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर आस्थापना या बंद ठेवण्यात येतील असेही स्पष्ट केले आहे. याशिवाय हॉटेल सुरु राहणार असली तरी त्यांच्याठिकाणी पार्सलची सुविधा असणार आहे.

ठाणे  महापालिका हद्दीत मागील काही दिवसापासून रुग्ण वाढीचा दर हा खाली आलेला दिसत आहे. राज्य शासनाने ज्या शहरांचा रुग्णवाढीचा दर हा १० टक्यांपैक्षा कमी असेल त्यांनी त्यांच्या पातळीवर निर्णय घ्यावे असे सूचित केले आहे. त्यानुसार ठाणे शहरातील रुग्ण वाढीचा दर हा मागील आठवडा भरात ७.८५ टक्यांच्या आसपासच दिसून आला आहे. आतार्पयत अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरु होती. परंतु आता त्या दुकानांसोबतच इतर आस्थापना म्हणजे कपडा, भाजी मार्केट, ज्वेलर्स, कटींग सलुनची दुकाने आदींसह इतर आस्थापना या सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु राहणार असल्याचे आदेश पारीत केले आहेत. त्याची अंमलबजावणी १ जून पासून केली जाणार आहे. 

दरम्यान, या आदेशातून मॉल्स वगळण्यात आलेले आहेत, त्यांना आपल्या आस्थापना सुरु करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. याशिवाय छोट्या स्वरुपातील हॉटेल सुरु राहतील. परंतु त्यांना ७ ते २ अशी असणार असून पार्सलची सुविधा असणार आहे. तसेच मोठी हॉटेल, रेस्टॉरेन्टमध्ये पुर्वी प्रमाणोच पार्सलची सेवा उपलब्ध असणार आहे. तसेच दुपारी २ नंतर केवळ मेडीकल दुकाने सुरु राहणार आहेत. शासकीय कार्यालयातील उपस्थिती ही २५ टक्के असणार आहे. होम डिलिव्हरीला परवानगी असणार आहे. तसंच कृषी विषयक दुकाने आठवड्याच्या सातही दिवस खुली राहणार आहेत.

ही आहेत कारणं..

ठाणे महापालिका हद्दीत मागील काही दिवसापासून रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. सध्याच्या घडीला महापालिका हद्दीत प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही १५९५ एवढी आहे. तर रुग्णवाढीचा वेग हा ७.८५ टक्के एवढा आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी हा ६९२ दिवसांवर गेला आहे. याशिवाय ५४४८ बेड पैकी सध्या ८६५ बेड भरलेलेले असून उर्वरीत ४ हजार ५८३ बेड हे रिक्त आहेत. याचाच अर्थ सध्याच्या घडीला ८४ टक्के बेड रिकामे आहेत. त्यातही ऑक्सिजनचे एकूण २९१० बेड पैकी ४३१ बेड भरलेलेले असून २ हजार ४७९ बेड रिकामे असून ८५ टक्के ऑक्सीजनचे बेड रिकामे आहेत. तर आयसीयूचे १०९२ बेड असून त्यातील २५४ बेड भरलेलेले असून ८३८ बेड रिकामे आहेत. म्हणजेच ७७ टक्के बेड शिल्लक आहेत. याशिवाय व्हेन्टिलेटरचे ३४२ बेड पैकी ७८ बेड भरलेलेले असून २६४ म्हणजेच ७७ टक्के बेड रिकामे आहेत.

Web Title: Coronavirus Break The Chain Other than essentials shops in Thane will be open from June 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.