CoronaVirus News: 'त्या' नवरदेवानं वाढवलं सगळ्यांचं टेन्शन; कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वीच गाठलं विवाहस्थळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 04:22 AM2020-06-18T04:22:40+5:302020-06-18T07:24:10+5:30

स्वॅब नमुने पाठविले असताना लग्न सोहळा

CoronaVirus case registered against groom in Jawahar | CoronaVirus News: 'त्या' नवरदेवानं वाढवलं सगळ्यांचं टेन्शन; कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वीच गाठलं विवाहस्थळ

CoronaVirus News: 'त्या' नवरदेवानं वाढवलं सगळ्यांचं टेन्शन; कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वीच गाठलं विवाहस्थळ

Next

जव्हार : खाजगी दवाखान्यातील एका कर्मचाऱ्याच्या लग्नाला अडीचशे ते तीनशे लोक जमवल्याने केळघर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी नवरदेवासह पाच जणांवर जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

या व्यक्तीचे लग्न ११ जूनला केळघर येथे झाले.तेथे ५० पेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. तसेच स्वॅबचे नमुने चाचणीसाठी पाठवलेले असताना हा लग्नसोहळा पार पाडला. त्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. या लग्नसोहळ्यात लोकांनी त्यांच्या तोंडावर मास्क अथवा रुमाल लावला बांधला नव्हता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने नवरदेव व त्यांच्या कुटुंबातील चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

नवरदेव कोरोबाधित एसटीच्या चालकाच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्याचे व इतर पाच व्यक्तींचे स्वाबचे नमुने १० जूनला घेतले होते. यानंतर त्याने शासकीय विलगीकरण कक्षात ठेवणे बंधन कारक असताना त्याचे लग्न पार पडले. त्यामुळे जव्हार तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून ३९ झाली आहे.

Web Title: CoronaVirus case registered against groom in Jawahar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.