coronavirus : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ओंडके टाकून केले गावातील रस्ते बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 02:06 PM2020-03-24T14:06:37+5:302020-03-24T14:07:43+5:30
कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी आता गांवकर्यांकडून अशी खबरदारीची उपाययोजना हाती घेतली जात आहे.
ठाणे : कोरोनाच्या विषाणुचा गावात संसर्ग होऊ नये म्हणून मुरबाड तालुक्यात 'कीसल ' या गावातून जाणार्या तिन्ही रस्त्यांवर गावाच्या प्रवेशद्वाराजवळ लाकडांचे ओंडके टाकून रस्तेच बंद केले आहेत. त्यामुळे अन्य गावातील वाहने गावातून जाणार नाही आणि संभाव्य कोरोना विषाणूंचा संसर्ग प्रादुर्भाव रोखणे शक्य होईल , ही उपाययोजना ठाणे जिल्ह्यातील गांवामध्ये सीमा बंदीच्या पाश्वभूमीवर गांवकर्यांकडून राबविण्यात येत आहे.
या प्रमाणेच मुरबाडच्या धारगांव, पारगांव, साखरे, सायले, रोठेपाडा आदी गावातील रस्ते अन्य गावातील ग्रामस्त, मोटरसाायकल , वाहणे आदीं करीता बंद केलेेेले आहेत, असेे या परिसरातील अंगणवाडी कार्यकर्ते भगवान दवणेे यांनी सांगितले.
किसल गावात गावबंदी केल्यामुळे शेजारच्या गावातही गावबंदी चालु केली आहे. त्यामुळे सर्व तालुक्यातच गावबंदी होण्याची शक्यता आहे. कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी आता गांवकर्यांकडून अशी खबरदारीची उपाययोजना हाती घेतली जात आहे.