Coronavirus : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच ३७९ रुग्ण सापडले; केवळ सहा जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 07:18 PM2020-11-15T19:18:44+5:302020-11-15T19:20:03+5:30
Coronavirus in Thane News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ३७९ रुग्ण रविवारी सापडल्याने आता जिल्ह्यातील रुग्ण संख्या दोन लाख १९ हजार ४७३ नोंदवल्या गेली आहे. तर, सहा जणांच्या मृत्यूने जिल्ह्यात आता पाच हजार ५२१ मृताांंची संख्या झाली
ठाणे - जिल्ह्यात कोरोनाचे ३७९ रुग्ण रविवारी सापडल्याने आता जिल्ह्यातील रुग्ण संख्या दोन लाख १९ हजार ४७३ नोंदवल्या गेली आहे. तर, सहा जणांच्या मृत्यूने जिल्ह्यात आता पाच हजार ५२१ मृताांंची संख्या झाली, अशी माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाने दिली आहे.
ठाणे शहरात फक्त ७७ रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ४८ हजार ८२३ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार १९० झाली आहे. कल्याण - डोंबिवलीला ८२ रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता ५१ हजार ७८० रुग्ण बाधीत असून एक हजार २८ मृत्यू आहेत.
उल्हासनगरला ११ रुग्ण आढळले. मात्र एकही मृत्यू नाही. आता या शहरात आता दहा हजार ४८५ रुग्ण बाधीत असून मृत्यू संख्या ३४८ झाली आहे. भिवंडी परिसरात फक्त एक रुग्ण सापडला असून एकही मृत्यू नाही. येथे सहा हजार ९६ बाधीतांची तर, ३३८ मृतांची नोंद कायम आहे. मीरा भाईंदरला ३३ रुग्णं असून एकाचाही मृत्यू नाही. या शहरात आता २३ हजार ३७३ बाधितांसह ७४४ मृतांची नोंद झालेेेली आहे.
अंबरनाथला १७ रुग्णांचा नव्याने शोध लागला एक मृत्यू झाला. या शहरात आता सात हजार ६०७ बाधितांसह २८३ मृतांची नोंद आहे. बदलापूरमध्ये २६ रुग्ण आज सापडल्याने बाधीत सात हजार ६६९ झाले आहेत. एकही मृत्यू नसल्यामुळे मृत्यूची संख्या ९८ कायम आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये ४३ रुग्णांचा आज शोधले असून येथे मृत्यू नाही. या गांवपाड्यांत आतापर्यंत १७ हजार ४७९ बाधीत असून ५५२ मृत्यूची नोंद आहे.