coronavirus: महाराष्ट्र कोरोनावर मात करून पुन्हा नव्या उमेदीने पूर्वीप्रमाणे उभे राहील, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 04:32 PM2020-06-17T16:32:49+5:302020-06-17T16:51:35+5:30
बुधवारी ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यातील 1024 बेड्सच्या कोवीड केअर सेंटरचे ई लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते व्हिडीओ कॉनर्फन्सीद्वारे बोलत होते. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यात टास्कफोर्सची निर्मिती करण्यात आली आहे.
ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून ते आजर्पयत आपल्या प्रत्येकाचे आयुष्य बदलले आहे. कोरोनाने प्रत्येकाला काही ना काही शिकविले आहे. आलेल्या संकाटाचा सामना कसा करायचा हे देखील कोरोनाने आपल्याला शिकविले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.
बुधवारी ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यातील 1024 बेड्सच्या कोवीड केअर सेंटरचे ई लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते व्हिडीओ कॉनर्फन्सीद्वारे बोलत होते. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यात टास्कफोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अनेकांनी मदत केली. मुख्यमंत्री निधीसाठी एका 85 र्षीच्या महिला डॉक्टरांनी सकाळी धनादेश सुपुर्द केला असून त्या एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांच्या मातोश्री असल्याचेही त्यांनी सांगितले. विदेशात जी औषधे वापरली जात आहेत, ती औषधे आपण राज्यात कोरोना बाधीत रुग्णांसाठी वापरली असल्याचेही त्यांनी सांगितले, कोरोनाचा सामना करतांना राज्याने कशा प्रकारे योगदान दिले याची माहिती मी पंतप्रधान मोदी यांना व्हिडीओ कॉनर्फन्सीद्वारे दाखविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मैदानातील हॉस्पीटल ही तात्पुरत्या स्वरुपाची आहेत, मात्र त्याठिकाणी आपण आयसीयु बेड, वीज, पाणी व शौचालयार्पयत सर्वच सुविधा चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरोनाच्या या काळात वैद्यकीय मदतही तितकीच महत्वाची ठरली असून कोरोना रुग्णांसाठी काम करणारे डॉक्टर, नेर्सेस, वॉर्डबॉय यांच्या रुपात देव काम करीत असल्याचेही दिसत आहे, असेही ते म्हणाले.
बीकेसी मैदान आणि ठाणो येथे उभारण्यात आलेली दोन्ही रुग्णालये युध्द पातळीवर उभारण्यात आली असून त्याचा मला अभिमान आहे. कोरोनाच्या उपाय योजनांमध्ये महाराष्ट्र जगाच्या पाठी नाही तर जगाच्या पुढे असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील दोन महिन्यात काही लाख खाटा उपचारासाठी निर्माण केल्या गेल्या ही मोठी गोष्ट आहे. आपण रुग्णालये, आरोग्य सुविधा निर्माण करीत आहोत, मात्र त्याचा वापर करण्याची वेळ कोणावरही येऊ नये अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
कोरोनाला रोखण्यासाठी आपण वस्ती पातळीवर ऑक्सीजन तपासणी सुरु केली आहे. 55 वर्षे वयोगटातील यात खासकरुन तपासणी केली जात आहे. त्यामुळे कोवीडच्या रुग्णांची लवकर ओळख होत असून त्यामुळे त्या रुग्णावर उपचार करणोही सोपे झाल्याचे त्यांनी सांगितले. धारावी हे मुंबईतील कोरोना बाधीत रुग्णांचे सर्वात मोठे हॉटस्पॉट होते. परंतु आता तेथील परिस्थितीतही सुधारणा झालेली आहे. धारावीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या देखील आता घटत असून येथील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. आपले राज्य या कोरोनावर मात करेल आणि पुन्हा नव्या उमेदीने आपण पहिल्या सारख्या राहू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी त्यांच्या समवेत ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, खासदार राजन विचारे, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, आयुक्त विजय सिंघल आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.