coronavirus: मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांचा हजाराचा आकडा पार, दिवसभरात आणखी 4 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 10:53 PM2020-06-08T22:53:59+5:302020-06-08T22:54:24+5:30
महापालिकेने कोरोना रुग्णां बाबत सोमवारी रात्री दिलेल्या माहिती नुसार शहरात कोरोनाचे आणखी 4 बळी तर नवीन 46 रुग्ण आढळून आले आहेत .
मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोना रुग्णांचा एक हजाराचा आकडा पार होऊन शहरात 1021 इतकी संख्या झाली आहे . तर बळींची संख्या देखील रोज वाढत असून आज आणखी 4 जणांचा मृत्यू झालेला असून एकूण मृतांची संख्या 59 वर पोहचली आहे .
महापालिकेने कोरोना रुग्णां बाबत सोमवारी रात्री दिलेल्या माहिती नुसार शहरात कोरोनाचे आणखी 4 बळी तर नवीन 46 रुग्ण आढळून आले आहेत . मीरारोड भागातील 15 तर भाईंदर भागातील 31 रुग्ण आहेत . अजून 319 जणांचा कोरोना चाचणी अहवाल यायचा बाकी आहे . दिवस भरात 18 रुग्ण बरे झाले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 634 इतकी झाली आहे . त्यामुळे शहरात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 328 इतके आहेत.