coronavirus: ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या घटली; केवळ ९६७ रुग्ण आढळले तर ३७ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 08:08 PM2020-08-17T20:08:17+5:302020-08-17T20:09:04+5:30
ठाणे महापालिकेने आज १९३ नवे रुग्ण शोधले आहेत. यामुळे या शहरात आतापर्यंत कोरोनाचे २३ हजार ४८८ रुग्ण सापडल्याची नोंद करण्यात आली आहे. आज सहा जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत ७५१ मृतांची नोंद करण्यात आली आहे.
ठाणे - कोरोनाचे ९६७ रुग्ण जिल्ह्यात सोमवारी नव्याने आढळले आहेत. यामुळे एक लाख सात हजार ५३३ रुग्ण आता जिल्ह्यात झाले आहेत. आज ३७ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आता तीन हजार ७५ मृतांची नोंद आतापर्यंत झाली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज रुग्ण संख्या घटल्याचे उघड झाले आहे.
ठाणे महापालिकेने आज १९३ नवे रुग्ण शोधले आहेत. यामुळे या शहरात आतापर्यंत कोरोनाचे २३ हजार ४८८ रुग्ण सापडल्याची नोंद करण्यात आली आहे. आज सहा जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत ७५१ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कल्याण - डोंबिवलीत आज २५० रुग्ण आढळून आले आहेत. या शहरात आता २४ हजार ६७० बाधीत रुग्ण झाले आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाल्याने आजपर्यंत ५०३ मृतांची नोंद झाली आहे.
नवी मुंबईत २४० रुग्णांची आज नोंद झाली आहे. तर पाच जण दगावले आहेत. आता नवी मुंबईत बाधीत २१ हजार १४० तर, ५११ मृतांची आजपर्यंत नोंद झाली आहे. उल्हासनगरला ३८ रुग्ण आज आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आतापर्यंत सात हजार ४०९ बाधीत, तर १८५ मृतांची नोंद करण्यात आली आहे.
भिवंडी महापालिका क्षेत्रात आज फक्त चार रुग्ण सापडले आहेत. या शहरात आजपर्यंत तीन हजार ९२७ बाधीत झाले आहेत. आज दोन मृतांची नोंद झाली असून शहरात आजपर्यंत २७३ जणांचा मृत्यू झाला आहे. मीरा - भाईंदरला नवीन ९८ रुग्ण सापडले तर सहा जणांच्या मृत्यूची आज नोंद झाली. या शहरात आता बाधीत दहा हजार ८११असून ३६७ मृत्यू आजपर्यंत नोंदवले आहेत.
अंबरनाथ शहरात २१ रुग्ण नव्याने आढळले असून दोन मृत्यू झाले आहे. आता या शहरात चार हजार ५०२ बाधीत रुग्णांची तर, १७४ मृतांची नोंद झाली आहे. बदलापूरमध्ये ५५ रुग्ण आज वाढले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण तीन हजार ४८४ झाले. तर आज तीन मृत्यू झाले आहेत. त्यामुळे मृत्यूची संख्या ६२ झाली आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये आज ६८ रुग्णांची नोंद झाली असून तिघे दगावले आहेत. आता बाधीत आठ हजार १०२ रुग्ण असून मृतांची संख्या २४९ झाली आहे.