CoronaVirus News: कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग ठाण्यात दुपटीने मंदावला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 11:38 PM2020-06-16T23:38:44+5:302020-06-16T23:39:18+5:30
ठाणेकरांसाठी चांगली बातमी; रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दुपटीने वाढले
- अजित मांडके
ठाणे : मागील काही दिवसांमध्ये ठाणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र रुग्णसंख्या दुपटीने वाढण्याचा कालावधी पूर्वी १0 दिवसांचा होता तो आता २0 दिवसांवर घसरला आहे. याशिवाय रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जवळपास दुपटीने वाढून ४७ टक्क्यांवर आले आहे. दुसरीकडे मृत्यूदर ३ टक्क्यांवर रोखण्यात पालिकेला यश आले आहे.
ठाण्यातील लोकमान्यनगर भागात मागील महिन्यात रुग्ण वाढत होते, त्या भागातही आता रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाले आहे. इतर प्रभाग समितींमध्येही हा दर कमी करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मागील महिनाभरात शहरात रुग्णांची संख्या कमालीची वाढली. रोज ३ ते ५ जणांचा मृत्यूही होत आहे. ठाणे शहरात सोमवारी रुग्णांची संख्या ५३0३ झाली आहे. आतापर्यंत १६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या २४८९ झाली आहे. प्रत्यक्ष उपचार घेणाºया रुग्णांची संख्या २६५१ एवढी आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण हे आता ४७ टक्क्यांवर आले आहे. ते मागील महिन्यात २५ टक्क्यांवर होते.
दरम्यान, शहरात रुग्ण वाढत असले तरी गुणाकाराने रुग्णसंख्या वाढण्याचा वेग मंदावला आहे. मागील महिन्यात साधारणत: १0 दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट व्हायची. त्यामुळे गुणाकाराने रुग्ण वाढल्याचे दिसत होते. परंतु मागील १0 दिवसांत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २0 दिवसांवर आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यामुळे हळूहळू का होईना संसर्गाचे प्रमाण आता कमी होत असल्याचेच दिसत आहे. प्रभाग समितींचा विचार केल्यास लोकमान्यनगर - सावरकरनगरमध्ये रुग्णसंख्या दुपटीने वाढण्याचे प्रमाण कमी करण्यात पालिकेला यश आले आहे.
एकीकडे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. लोकमान्य सावरकरनगरमध्ये रुग्णवाढीचा वेग
वागळे इस्टेटमध्ये रुग्णवाढीचा वेग ३.५ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण