Coronavirus: कोरोना रुग्णाची माहिती रुग्णालयाने दडवली; संसर्गाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:59 AM2020-05-07T05:59:52+5:302020-05-07T06:00:00+5:30
इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून रगडे यांनी ही माहिती आयुक्त, मध्यवर्ती रुग्णालयाला दिली. त्यानंतर महिलेला कोरोना रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.
उल्हासनगर : कल्याणमधील एका खासगी रुग्णालयाने एक महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती लपवून ठेवून तिला तिच्या अल्पवयीन मुलासह उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात सोडल्याचा प्रकार मंगळवारी घडला. समाजसेवक शिवाजी रगडे यांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी आयुक्तांसह मध्यवर्ती रुग्णालय गाठले.
त्यानंतर तिला कोरोना रुग्णालयात पाठविले असून कुटुंबासह नातेवाईकांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील सम्राट अशोकनगर झोपडपट्टीत राहणारी ३५ वर्षीय महिला कल्याण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती.
महिलेची तपासणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. रुग्णालयाने ही माहिती लपवून ठेवून महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलाला मंगळवारी मध्यवर्ती रुग्णालयात सोडून दिले.
इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून रगडे यांनी ही माहिती आयुक्त, मध्यवर्ती रुग्णालयाला दिली. त्यानंतर महिलेला कोरोना रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. कल्याण येथील खाजगी रुग्णालयात झालेल्या या प्रकाराने संताप व्यक्त होत असून महापालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत खुलासा मागितला आहे.