coronavirus: ठाण्यात २९ आरोग्य केंद्रांत कोरोना चाचण्यांची सोय, महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 01:40 AM2020-07-07T01:40:35+5:302020-07-07T01:41:07+5:30

ठाणे शहरात दिवसागणिक कोरोनाबाधीतांची संख्या वाढत आहे. आजघडीला शहरात ५२०१ अ‍ॅटिव्ह रुग्ण असून ५१२८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

coronavirus: Corona testing facility in 29 health centers in Thane, an important decision of the Municipal Corporation | coronavirus: ठाण्यात २९ आरोग्य केंद्रांत कोरोना चाचण्यांची सोय, महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

coronavirus: ठाण्यात २९ आरोग्य केंद्रांत कोरोना चाचण्यांची सोय, महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

Next

- अजित मांडके
ठाणे : कोरोना रुग्णांचे निदान तत्काळ व्हावे, त्याला वेळेत उपचार मिळावेत आणि मृत्यूदर रोखण्यासाठी महापालिकेने प्रभाग समितीअंतर्गत असलेल्या प्रत्येक आरोग्यकेंद्रात आता खाजगी लॅबच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे चाचण्यांची संख्या वाढून ही साखळी रोखण्यातही यश मिळेल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

ठाणे शहरात दिवसागणिक कोरोनाबाधीतांची संख्या वाढत आहे. आजघडीला शहरात ५२०१ अ‍ॅटिव्ह रुग्ण असून ५१२८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ४०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचाचणीचा वेग वाढत नसल्याने रुग्णांचे निदान वेळेत होत नव्हते. त्यामुळे अनेकांनी महापालिकेवर टीका केली
होती.

तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील स्क्रिनींग व चाचण्या वाढवा असे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने हे पाऊल उचलले आहे.
यासाठी खाजगी लॅबच्या माध्यमातून शहरातील २९ आरोग्यकेंद्राच्या ठिकाणी आता कोरोना चाचणी केली जाणार आहे. यामुळे त्या त्या भागातील नागरीकांना आता शहरभर फिरून खाजगी लॅबचा शोध घ्यावा लागणार नाही. आता त्यांना त्यांच्या घराजवळच ही सुविधा उपलब्ध करून दिली असून तशा आशयाचे परिपत्रकही पालिकेने काढले आहे.

दिवसाला होणार ३३५० चाचण्या
यानुसार आता या आरोग्य केंद्रात दिवसाला ३३५० च्या आसपास कोरोनाच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. खाजगी प्रयोगशाळांच्या प्रमुखांना काही अधिकार दिले आहेत. तर प्रत्येक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी एक ते तीन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकादेखील केल्या आहेत. तसेच उपायुक्त आणि सहायक आयुक्तांनादेखील प्रमुख जबाबदाºया सोपविल्या आहेत. या चाचण्यांसाठी खाजगी लॅबचे दर निश्चित केले असून ते रुग्णांना द्यावे लागणार आहेत.

Web Title: coronavirus: Corona testing facility in 29 health centers in Thane, an important decision of the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.