Coronavirus: मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाचा चौथा बळी; दिवसभरात वाढले 10 कोरोना रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 09:22 AM2020-05-05T09:22:07+5:302020-05-05T09:22:31+5:30
भाईंदरमधील कोरोनाचा हा पहिला बळी असून या आधी मीरा रोडमध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे.
मीरारोड - मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाने 50 वर्षांच्या इसमाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 10 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने एकूण कोरोना रुग्णांची संख्या 181 वर पोहोचली आहे. भाईंदरच्या शिवसेना गल्लीतील 50 वर्षीय इसमाचा रविवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. सदर इसमास ओम रुग्णालयात दाखल केले होते. भाईंदरमधील कोरोनाचा हा पहिला बळी असून या आधी मीरा रोडमध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे.
दिवसभरात शहरात 10 नवीन रुग्ण आढळले आहेत. भाईंदरच्या मोदी पटेल मार्ग, जे पी ठाकूर मार्ग, न्यू गोल्डन नेस्ट, कस्तुरी पार्क, खारीगाव, नवघर पोलीस ठाणे जवळ, सिद्धिविनायक रुग्णालय मार्ग तर मीरा रोडच्या आयडियल पार्क व रॉयल पार्क भागातून नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. शहरातील नवनवीन भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने चिंता वाढली आहे. शहरात एकूण कोरोनाचे 181 रुग्ण झाले असून त्यातील 102 जण बरे झाले आहेत. अजून 77 जणांचे चाचणी अहवाल यायचे आहेत.