coronavirus: ठाणे शहरात कोरोनाची साथ आली आटोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 02:23 AM2021-02-04T02:23:13+5:302021-02-04T02:23:37+5:30

coronavirus: कोरोनाने मार्चमध्ये २०२० पासून हाहाकार उडवून दिला होता. ठाणे मनपा हद्दीत एप्रिल, मे महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने झालेली वाढ व होणारे मृत्यू, यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली होती. मात्र, मागील दोन ते तीन महिन्यांपासून रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे.

coronavirus: Coronavirus arrested in Thane | coronavirus: ठाणे शहरात कोरोनाची साथ आली आटोक्यात

coronavirus: ठाणे शहरात कोरोनाची साथ आली आटोक्यात

Next

ठाणे -  कोरोनाने मार्चमध्ये २०२० पासून हाहाकार उडवून दिला होता. ठाणे मनपा हद्दीत एप्रिल, मे महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने झालेली वाढ व होणारे मृत्यू, यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली होती. मात्र, मागील दोन ते तीन महिन्यांपासून रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. रुग्णदुपटीचा कालावधी ६०२ दिवसांवर गेल्याने नागरिकांसाठी ही आनंदाची बाब आहे. दररोज आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही आता ३०० ते २५० वरून थेट १००च्या आत आले असून ते ०.१३ टक्के झाले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५९ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर, मृत्युदर २.२२ टक्क्यांवर आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठामपा प्रशासन व आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आक्त. झोपडपट्ट्यांमध्ये औषध व धूरफवारणी, सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण करणे आदी उपाययोजना केल्या जात आहेत. बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्या परिसराचे निर्जंतुकीकरण तसेच त्याच्या घरातील सदस्यांना क्वारंटाइन करणे आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच काही महिन्यांपासून नागरिकांच्या कोरोना चाचण्याही करण्यात येत आहेत. त्यामुळे दररोज आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ३०० ते ४०० वरून आता १००पर्यंत घट झाली आहे. मनपा क्षेत्रात आतापर्यंत १० लाख ३६१ नागरिकांच्या कोरोना चाचण्या झाल्या असून, त्यापैकी ५८ हजार ५५० कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ५६ हजार ५५६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्याचे प्रमाण ९६.५९ टक्के इतके आहे. तर, शहरात आतापर्यंत एक हजार ३०१ रुग्ण मृत पावले असून, त्याचे प्रमाण २.२२ टक्के इतके आहे. शहरात सध्या केवळ ६९३ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यामध्ये २७६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून २६७ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत, असून नऊ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दुसरीकडे ३२ रुग्ण होम क्वारंटाइन तर, २१ रुग्ण हे मनपा हद्दीबाहेरील रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली. 

 

Web Title: coronavirus: Coronavirus arrested in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.