coronavirus: ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या मृत्यू संंख्येत घट, अवघ्या २८९ रुग्णांसह पाच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 09:09 PM2021-01-11T21:09:05+5:302021-01-11T21:09:46+5:30
coronavirus: ठाणे जिल्ह्यात सोमवारी अवघे २८९ कोरोना रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात दोन लाख ४७ हजार ४०२ रुग्ण झाले आहेत. तर, आज फक्त पाच रुग्णांच्या मृत्यूने जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ३३ झाली आहे.
ठाणे - जिल्ह्यात सोमवारी अवघे २८९ कोरोना रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात दोन लाख ४७ हजार ४०२ रुग्ण झाले आहेत. तर, आज फक्त पाच रुग्णांच्या मृत्यूने जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ३३ झाली आहे. उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदरला, अंबरनाथ, बदलापूर आणि जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात एकही मृत्यू झालेला नाही.
ठाणे शहरत ११४ रुग्ण आढळले आहेत. या शहरात ५६ हजार ७६७ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली. आज केवळ तीन जणांचा मृत्यूने मृतांची संख्या आता एक हजार ३३१ झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत ६४ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता येथे ५८ हजार ५७३ बाधीत असून एक हजार ११८ मृतांची संख्या आहे.
उल्हासनगरात १२ नवे रुग्ण आढळले असून या शहरात आता ११ हजार ४६१ रुग्ण संख्या असून मृतांची संख्या ३६३ झाली आहे. भिवंडी शहरात तीन बाधीत आढळले आहेत. यासह आता या शहरात बाधीत सहा हजार ६४४ झाले असून मृतांची संख्या ३५२ आहे. मीरा भाईंदरमध्येत २६ रुग्णांची वाढ झाली असून एका मृत्यू नाही. आता बााधीत २५ हजार ८२१ झाले आहेत, तर, मृत्यू ७९० आहेत.
अंबरनाथमध्ये श पाच रुग्ण नव्याने वाढले असून एकही मृत्यू नाही. या शहरात बाधितांची संख्या आठ हजार ४०७ झाली असून मृतांची संख्या ३०७ आहे. बदलापूरमध्ये सात रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्य नऊ हजार ४५ झाली आहे. आज एकाच्या मृत्यूने मृतांची संख्या १२० आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात नऊ रुग्णांची वाढ झाल्याने १८ हजार ८९६ बाधितांसह मृतांची ५८२ कायम आहे.