Coronavirus: उल्हासनगरात कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या ९ जणांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 02:45 PM2020-05-15T14:45:06+5:302020-05-15T14:45:30+5:30
तसाच प्रकार दोन दिवसापूर्वी पुन्हा घडल्याने शहर प्रशासनाचे धिंडवडे निघाले आहे. संच्युरी रुग्णालयात एका कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाला.
सदानंद नाईक
उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयाची आदेश धुडकावून संशयीत कोरोना रुग्णाच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या पैकी 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले.याप्रकरणी खन्ना कंपाऊन परिसरात खळबळ उडाली असून अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या पैकी अनेकजण मोकाट असल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर खन्ना कंपाऊंड येथील एका जणाचा गेल्या शनिवारी मध्यवर्ती रुग्णालयात मुत्यु झाला. डॉक्टरांनी त्याला कोरोना संशयीत घोषीत करून बांधलेला मुतदेह उघडू नका. या अटीवर मुतदेह कुटुंबाच्या अंत्यसंस्कार साठी ताब्यात दिला. मात्र कुटुंबांनी मुतदेह घरी नेवून उघडून अंत्ययात्रा काढली. दुसऱ्या दिवसी मृत झालेल्या इसमाचा कोरोना रिपोर्ट पोझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. महापालिका आरोग्य विभागाने कुटुंबासह अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या 70 पेक्षा जास्त नागरिकांना क्वारंटाईन केले. शुक्रवारी त्यांच्या स्वाब अहवालात तब्बल 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. महापालिकेने खन्ना कंपाऊंड परिसर सील केला असून पालिका व मध्यवर्ती रुग्णालयाच्या दिरंगाई मुळे शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे टीका होत आहे. तसेच सबंधितावर कारवाईची मागणी सर्वस्तरातून होत केली जात आहे.
तसाच प्रकार दोन दिवसापूर्वी पुन्हा घडल्याने शहर प्रशासनाचे धिंडवडे निघाले आहे. संच्युरी रुग्णालयात एका कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने कुटुंबाच्या ताब्यात मुतदेह देताना बांधलेला मुतदेह उघडू नका. सार्वजनिकरित्या अंत्ययात्रा काढू नका. असे सुचविले होते. मात्र तसे आले नसून संशयित मृत रुग्णाची अंत्ययात्रा काढल्याचे बोलले जाते. तसेच संशयित मृत रुग्णाचा कोरोना अहवाल शुक्रवारी पोझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. एकूणच शहरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून शुक्रवारी 10 रुग्ण कोरोना पोझिटीव्ह मिळाल्याने एकून कोरोना रुग्णाची संख्या 91 झाली आहे. त्यापैकी 5 जणाचा मुत्यू झाला असून 8 जण कोरोना मुक्त झाले. तर 78 जणांवर कोरोना रुग्णालयात उपचार सुरु आहे.