coronavirus: मिरा-भाईंदरमधील शिवसेनेच्या नगरसेविकेस कोरोनाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 06:41 PM2020-07-03T18:41:26+5:302020-07-03T18:41:26+5:30

तारा घरत ह्या गोडदेव भागात राहणाऱ्या असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गुरुवारी त्या पालिकेच्या कोविड केअर मध्ये उपचारासाठी दाखल झाल्या

coronavirus: Coronavirus infects Shiv Sena corporator in Mira Bhayandar | coronavirus: मिरा-भाईंदरमधील शिवसेनेच्या नगरसेविकेस कोरोनाचा संसर्ग

coronavirus: मिरा-भाईंदरमधील शिवसेनेच्या नगरसेविकेस कोरोनाचा संसर्ग

Next

मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या शिवसेना नगरसेविका तारा घरत यांना कोरोनाची लागण झाल्याने त्या महापालिकेच्या रामदेव पार्क येथील कोविड केअर मध्ये उपचारासाठी दाखल झाल्या आहेत. त्यांच्या ६ महिन्यांच्या नातवास देखील लागण झाली असून, त्या आधी त्यांचा मुलगा व दोन सुनांना कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कोविड केअर मध्ये दाखल केले होते . 

तारा घरत ह्या गोडदेव भागात राहणाऱ्या असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गुरुवारी त्या पालिकेच्या कोविड केअर मध्ये उपचारासाठी दाखल झाल्या . त्यांचा अग्निशमन दलातील कंत्राटी कर्मचारी असलेला मुलगा व त्याची पत्नी तसेच त्यांची मोठी सून कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आधीच सदर ठिकाणी दाखल झाले होते . 

घरत यांचे सहकारी नगरसेवक असलेले हरिश्चंद्र आमगावकर यांचा कोरोना मुळे ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान जून मध्ये मृत्यू झाला होता . तर भाजपचे काशिमीरा येथील नगरसेवक कोरोना मुळे कांदिवलीच्या रुग्णालयात उपचार घेऊन परतले आहेत . मीरारोड येथील भाजपा नगरसेवक वोक्हार्ट रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत . परंतु नगरसेविका घरत यांनी मात्र स्वतः  कुटुंबियांसह खाजगी रुग्णालयात न जाता महापालिकेच्या कोविड केअर मध्ये उपचार घेण्यास प्राधान्य दिले. 
आमदार गीता जैन यांच्या पाठोपाठ त्यांचे पती भरत जैन देखील कोरोना पॉझिटिव्ह झाले असून दोघांना त्यांच्या बंगल्यातच अलगीकरण करून ठेवले आहे .

Web Title: coronavirus: Coronavirus infects Shiv Sena corporator in Mira Bhayandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.