Coronavirus: कोरोना रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध; संतप्त नागरिकांना पोलिसांचा चोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 03:35 AM2020-05-06T03:35:20+5:302020-05-06T03:35:36+5:30

नागरिक संतप्त : पोलिसांकडून काठ्यांचा प्रसाद

Coronavirus: Coronavirus opposes cremation of patient; Police beat angry citizens | Coronavirus: कोरोना रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध; संतप्त नागरिकांना पोलिसांचा चोप

Coronavirus: कोरोना रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध; संतप्त नागरिकांना पोलिसांचा चोप

Next

भाईंदर : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह जाळू देण्यास भार्इंदर पश्चिमेच्या स्मशानभूमी परिसरातील रहिवाशांनी सोमवारी मध्यरात्री विरोध केला. अखेर पोलिसांनी जमावाला पिटाळल्यानंतर दहनविधी करण्यात आला.

भार्इंदर पश्चिमेच्या आंबेडकरनगर झोपडपट्टी भागात पालिकेची स्मशानभूमी आहे. सोमवारी मध्यरात्री कोरोनामुळे निधन झालेल्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणला. कोरोना रुग्णाचा मृतदेह असल्याचे कळताच स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी दहनविधीला नकार देत पोबारा केला. आजूबाजूच्या रहिवाशांना याची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने जमाव स्मशानभूमी बाहेर जमला.
मृतदेहावर अंत्यसंस्कार येथे करु देणार नाही असे सांगत नागरिकांनी विरोध केला. पोलिसांना घटनास्थळी जात नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हा मृतदेह जाळल्याने आजूबाजूच्यांना त्रास होणार नाही असे समजावूनही नागरिक ऐकायला तयार नसल्याने पोलिसांनी लाठीमार करत जमाव पांगवला. त्या नंतर मृतदेहावर दहनविधी केले.

Web Title: Coronavirus: Coronavirus opposes cremation of patient; Police beat angry citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.