coronavirus : अँटीजेन चाचणी न करताच कोरोना अहवाल आला निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 03:17 PM2020-11-13T15:17:29+5:302020-11-13T15:18:10+5:30

Mira Bhayander News : मीरा भाईंदर महापालिके कडून अँटीजेन चाचणी न करताच अहवाल मात्र निगेटिव्ह देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .

coronavirus: Coronavirus reported negative without antigen test | coronavirus : अँटीजेन चाचणी न करताच कोरोना अहवाल आला निगेटिव्ह

coronavirus : अँटीजेन चाचणी न करताच कोरोना अहवाल आला निगेटिव्ह

Next

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिके कडून अँटीजेन चाचणी न करताच अहवाल मात्र निगेटिव्ह देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . त्यामुळे चाचणी न करता अहवाल पाठवणाऱ्या अश्या काही मोजक्या बेजबाबदार कर्मचाऱ्यां मुळे पालिकेच्या एकूणच या चाचणी मोहिमे बद्दल गैरसमज निर्माण होत आहेत . 

उत्तनला राहणारे रोशन डिसोझा हे पत्नी सेलमा सोबत भाईंदरच्या नगरभवन येथील तलाठी कार्यालयात त्यांच्या कामासाठी गुरुवारी सकाळी गेले होते . त्यावेळी नगरभवनच्या प्रवेशद्वारा जवळच तीन कर्मचारी टेबल टाकून अँटीजेन चाचणी करण्यासाठी म्हणून बसलेले होते . 

सदर कर्मचाऱ्यांनी रोशन व त्यांच्या पत्नीस अँटीजेन चाचणी करून घेण्यास सांगितले असता सेलमा यांनी आपणास तशी काही लक्षणं नसल्याने चाचणीची गरज नाही असे सांगितले . परंतु रोशन यांनी तयारी दर्शवली असता त्यांचे नाव , पत्ता आणि मोबाईल क्रमांक त्या कर्मचाऱ्यांनी नोंदवून घेतला . परंतु त्यांची चाचणी मात्र करण्यातच आली नाही . 

नंतर रोशन कार्यालयात गेले आणि तलाठी अनिता पाडवी यांना भेटून त्यांच्या सातबारा फेरफार करण्याचा अर्ज देऊन घरी परतले . परंतु काही तासाने रोशन यांना संदेश आला कि, तुम्ही केलेली चाचणी निगेटिव्ह आलेली आहे . त्या संदेशात रोशन यांना दिलेला ओळख आयडी , त्यांच्या चाचणी साठी नमुने घेतलेल्याचा आयडी क्रमांक तसेच त्या अहवालाच्या माहितीसाठीची लिंक सुद्धा देण्यात आली आहे . 

आपण चाचणी केली गेली नसताना चक्क चाचणी अहवाल कसा आला असा प्रश्न रोशन यांना पडला आहे . शासन व पालिका कोरोना रुग्णांची ओळख व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत आहे , विविध उपक्रम व जनजागृती करत असताना अश्या काही कामचुकार व बेजबाबदार कर्मचाऱ्यां मुळे चाचणी मोहिमेलाच बट्टा लावला जात असल्याचा संताप त्यांनी बोलून दाखवला . 

Web Title: coronavirus: Coronavirus reported negative without antigen test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.